तमन्ना भाटियाची नवीन वेबसीरिज 'जी करदा', रिलीज डेट केली जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 06:51 PM2023-06-02T18:51:28+5:302023-06-02T18:51:39+5:30

Tamannaah Bhatia : तमन्ना भाटियाची नवीन वेबसीरिज 'जी करदा' रोमँटिक ड्रामावर आधारीत आहे.

Tamannaah Bhatia's new web series 'Jee Karda', release date announced | तमन्ना भाटियाची नवीन वेबसीरिज 'जी करदा', रिलीज डेट केली जाहीर

तमन्ना भाटियाची नवीन वेबसीरिज 'जी करदा', रिलीज डेट केली जाहीर

googlenewsNext

अभिनेत्री तमन्ना भाटिया(Tamnnaah Bhatia)ची आगामी वेबसीरिज 'जी करदा'चा वर्ल्ड प्रीमियर जाहीर झाला आहे. Amazon Original Series 'Je Karda' ही एक रोमान्स ड्रामा आहे. ही सीरिज बालपणीच्या सात मित्रांभोवती फिरते ज्यांना त्यांच्या ३०व्या वर्षी आपण विचार केला तसे जीवन नाही हे लक्षात येते. या वेब शो मध्ये  तमन्ना भाटिया, आशिम गुलाटी, सुहेल नय्यर, अन्या सिंग, हुसैन दलाल, सायन बॅनर्जी, आणि सामवेदना सुवाल्का हे मित्रांच्या भूमिकेत आहेत. या वेब शो मध्ये सिमोन सिंग आणि मल्हार ठकर देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

जी करदाची कथा बालपणीच्या सात मित्रांभोवती फिरते. ज्यांनी विचार केला होता जेव्हा ते ३० वर्षांचे होतील, तेव्हा त्यांचं जीवन सुरळीत असेल. पण वयाच्या तिशीत त्यांना समजते की आपण विचार केला तसे झाले आहे. यात अनेक समस्या आहेत. ते जिंकतात, प्रेम करतात, हसतात, एकत्र चुका करतात, त्यांनी मनं तुटतात पण या सगळ्यातून त्यांना समजते की त्यांच्याकडे चांगले मित्र आहेत.

अरुणिमा शर्मा लिखित आणि दिग्दर्शित, हुसैन दलाल, अब्बास दलाल लिखित आणि दिनेश विजन यांच्या मॅडॉक फिल्म्स निर्मित, आठ भागाचा हा वेब शो नक्कीच प्रेक्षकांना आवडणार यात शंका नाही. या मालिकेबद्दल बोलताना दिनेश विजन म्हणाले, 'जी करदा' हा प्राइम व्हिडिओशी आमचा पहिला संबंध आहे आणि आमचा सर्जनशील प्रवास सुरू करण्याचा यापेक्षा चांगला मार्ग असूच शकत नाही. ही कथा नात्यातील विश्वासाची आहे. भारतासह जगभरातील २४० देशांमध्ये या मालिकेचा प्रीमियर होणार आहे. 'जी करदा'चा वर्ल्ड प्रीमियर १५ जून २०२३ रोजी होणार आहे.

 

Web Title: Tamannaah Bhatia's new web series 'Jee Karda', release date announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.