"माझे आईवडीलही असं विचारत नाहीत" चाहत्याच्या 'त्या' प्रश्नावर भडकली तमन्ना भाटिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 13:53 IST2023-09-06T13:52:24+5:302023-09-06T13:53:02+5:30

तमन्ना भाटिया आणि विजय वर्माच्या रिलेशनशिपच्या चर्चा जोर धरुन आहेत.

tamannah bhatia fumes as fan asked her question about her marriage and dating | "माझे आईवडीलही असं विचारत नाहीत" चाहत्याच्या 'त्या' प्रश्नावर भडकली तमन्ना भाटिया

"माझे आईवडीलही असं विचारत नाहीत" चाहत्याच्या 'त्या' प्रश्नावर भडकली तमन्ना भाटिया

अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannah Bhatia)  सध्या प्रोफेशनल आणि पर्सनल दोन्ही आयुष्यामुळे चर्चेत आहे. रजनीकांतच्या 'जेलर' सिनेमात ती झळकली. तसंच 'लस्ट स्टोरीज 2' मध्ये तिने दिलेल्या इंटिमेट सीन्समुळेही तिची चर्चा झाली. या सिनेमातील तिचा कोस्टार विजय वर्मासोबत (Vijay Varma) तिच्या अफेअरच्या चर्चांनाही उधाण आलंय. विजय माझी 'हॅपी प्लेस' असल्याचं स्वत: तमन्नानेच कबूल केलंय. नुकतंच तमन्नाला लग्नावरुन प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ती जाम भडकली. 

तमन्नाला एका चाहत्याने विचारले, 'तू लग्न कधी करणार आहेस?' चाहत्याच्या या प्रश्नावर तमन्ना भडकली आणि म्हणाली, 'माझे आई वडीलही मला हा प्रश्न विचारत नाहीत.' यानंतर तिला आणखी एक प्रश्न विचारण्यात आला. 'तुला कोणी चांगला मुलगा मिळाला आहे का?' यावर ती म्हणाली, 'मी सध्या माझ्या आयुष्यात खुश आहे. हो मी खूप खुश आहे.'

तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा नुकतेच मालदीववरुन परतले आहेत. दोघांनी तिथे सुट्ट्या एन्जॉय केल्या. यानंतर मुंबई विमानतळावर दोघंही वेगवेगळे बाहेर पडले. तेव्हा विजयलाही पापाराझींनी असा काही प्रश्न विचारला ज्यामुळे तो चांगलाच भडकला होता. सध्या दोघंही अनेक ठिकाणी सोबत दिसत आहेत. विजय वर्मा आगामी 'जाने जान' सिनेमात करिना कपूरसोबत दिसत आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

Web Title: tamannah bhatia fumes as fan asked her question about her marriage and dating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.