मी खूश आहे! विजय वर्मासोबत ब्रेकअपनंतर तमन्ना भाटियाचं वक्तव्य, म्हणाली- "मी जे निवडलं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 18:08 IST2025-03-21T18:08:08+5:302025-03-21T18:08:37+5:30
विजय वर्माशी ब्रेकअप झाल्यानंतर तमन्नाने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. तमन्नाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या पर्सनल लाइफबद्दल वक्तव्य केलं आहे.

मी खूश आहे! विजय वर्मासोबत ब्रेकअपनंतर तमन्ना भाटियाचं वक्तव्य, म्हणाली- "मी जे निवडलं..."
सिनेइंडस्ट्रीतील तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा या लोकप्रिय कपलचं काही दिवसांपूर्वीच ब्रेकअप झाल्याची चर्चा रंगली आहे. पण, अद्याप तमन्ना किंवा विजय वर्माने ऑफिशियली याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अशातच विजय वर्माशी ब्रेकअप झाल्यानंतर तमन्नाने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. तमन्नाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या पर्सनल लाइफबद्दल वक्तव्य केलं आहे. वैयक्तिक आयुष्यात खूश असल्याचं तिने म्हटलं आहे.
तमन्नाने नुकतीच IANS ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला "सेलिब्रिटी असूनही तुझं पर्सनल आयुष्य कसं सुरक्षित ठेवते", असा प्रश्न विचारण्यात आला. याचं उत्तर देताना ती म्हणाली, "मला लोकांचा सहवास आवडतो. म्हणूनच एअरपोर्टवरही जे लोक माझ्याकडे फोटो मागतात. त्यांनाही मी फोटो देते. मला यात आनंद मिळतो. एकाने मला विचारलं होतं की तुला असं बघून मला कंटाळा आला. तुला हे सगळं करताना कंटाळा येत नाही का? मी त्याला म्हटलं की मी हे प्रोफेशन निवडलं आहे. मला लोकांमध्ये राहायला आवडतं. मी जे निवडलं आहे त्यात मी खूश आहे".
"मी माझ्या पर्सनल लाइफबद्दल गोपनियता ठेवते. ज्या गोष्टी शेअर करण्यात मला कम्फर्टेबल वाटतं त्याच गोष्टी मी शेअर करते. त्यामुळे गोष्टी वर्क आऊट होतात. आणि त्याबद्दल काहीच तक्रार नाही", असंही पुढे तमन्ना म्हणाली. तमन्ना आणि विजय वर्मा २०२२ पासून एकमेकांना डेट करत होते. ते लग्न करणार असल्याच्याही चर्चा होत्या. त्यामुळेच त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे.