Shocking! तामिळ अभिनेता Vikram ला हृदयविकाराचा झटका?; रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 05:00 PM2022-07-08T17:00:46+5:302022-07-08T17:01:51+5:30

Actor vikram: अचानकपणे विक्रमच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्याला चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

tamil actor vikram heart attack admitted to hospital chennai | Shocking! तामिळ अभिनेता Vikram ला हृदयविकाराचा झटका?; रुग्णालयात दाखल

Shocking! तामिळ अभिनेता Vikram ला हृदयविकाराचा झटका?; रुग्णालयात दाखल

googlenewsNext

दाक्षिणात्य सुपरस्टार चियान विक्रम (Vikram) याला प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अचानकपणे विक्रमच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्याला चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काहींच्या मते, विक्रमला हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगण्यात येत आहे. मणिरत्नमच्या 'पोन्नियिन सेलवन' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या विक्रमच्या प्रकृतीची माहिती समोर येताच चाहत्यांमध्ये गोंधळ उडाला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, विक्रमला हृदयविकाराचा झटका आला आहे. तर, त्याच्या पीआरने दिलेल्या माहितीनुसार, विक्रमला प्रचंड ताप भरला होता. त्यानंतर त्याच्या छातीत दुखू लागलं त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.

५६ वर्षीय विक्रम लवकरच पोन्नियिन सेलवन या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन स्क्रीन शेअर करणार असून ४ वर्षांनंतर ती रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

दरम्यान, पोन्नियिन सेलवननंतर विक्रम कोबरा या चित्रपटातही दिसणार आहे. त्यामुळे २०२२ मध्ये त्याचे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. कोबरा ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. तर, पोन्नियन सेलवन ३० सप्टेंबर रोजी. विक्रमने तामिळव्यतिरिक्त हिंदी, तेलुगू चित्रपटांमध्येही काम केलं आहे. 1990 मध्ये कलाविश्वात पदार्पण करणारा विक्रम सेतु चित्रपटामुळे प्रकाशझोतात आला. या चित्रपटानंतर तो 'जेमिनी', 'समुराई', 'धूल', 'कधल सदुगुडु', 'सामी', 'पीथमगन', 'अरुल', 'अन्नियां', 'भीमा', 'रावणन', 'दीवा थिरुमगल', 'डेविड', 'इरु मुगन', 'महान' यांसारखे हिट चित्रपट दिले.

Web Title: tamil actor vikram heart attack admitted to hospital chennai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.