“आयुष्य अजिबात सुंदर नाही” म्हणत अभिनेत्रीची आत्महता, अवघ्या 29 व्या वर्षी गळफास घेत संपवलं जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 12:32 PM2022-09-20T12:32:52+5:302022-09-20T12:34:28+5:30
Actress Suicide : चेन्नईतील राहत्या घरी तिचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळला. समोर आलं आत्महत्येचं कारण
तामिळ चित्रपटसृष्टीत एक धक्कादायक घटना घडली आहे. तामिळ अभिनेत्री दीपा उर्फ पॉलिन जेसिका (Deepa aka Pauline Jessica) हिनं गळफास घेत आत्महत्या केली. अवघ्या 29 वर्षी तिनं मृत्यूला कवटाळलं. चेन्नईतील राहत्या घरी तिचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळला.
तिचं खरं पॉलिन जेसिका होतं. पण ती दीपा या तिच्या स्टेज नावाने लोकप्रिय होती. पोलिसांना दीपाची एक डायरी सापडली आहे. पोलिसांनी या डायरीला सुसाईड नोट म्हणून गृहित धरलं आहे. दीपाने तिच्या डायरी आयुष्याचा कंटाळा आल्याचं लिहिलं होतं. आयुष्य अजिबात सुंदर नाही. कारण माझ्याकडे मला आधार देणारं कुणीही नाही, असं तिने लिहिलं आहे. रिलेशनशिपबद्दलही तिने लिहिलं आहे. मी अशा व्यक्तिवर प्रेम केलं, ज्याने कधीच माझ्या प्रेमाचा स्वीकार केला नाही, असा उल्लेखही डायरीत आहे. अभिनेत्रीच्या डायरीतून पोलिसांना तिच्या लव्ह लाईफबद्दल माहिती मिळाली आहे. पोलिस तिच्या प्रियकराचा शोध घेत आहेत.
The 29-year-old Tamil actor Pauline Jessica, popularly known by her stage name Deepa, died by suicide. She was found dead in her apartment in Chennai.
— ANI (@ANI) September 20, 2022
(Pic Source: Pauline Jessica's Instagram account) pic.twitter.com/pdGyIZELJF
काही रिपोर्ट्सनुसार, दीपा एका मुलावर खूप प्रेम करत होती, पण दोघांच्या नात्यात सगळं आलबेल नव्हतं. नात्यातील अडचणींमुळे तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.
दीपा चेन्नईच्या विरुगम्बक्कम मल्लिकाई एव्हेन्यूमध्ये एकटीच राहत होती. दीपाचे नातेवाईक तिला सतत फोन करत होते, पण ती कॉलला उत्तर देत नव्हती. दीपा फोन उचलत नसल्याने तिचा मित्र प्रभाकरन तिच्या घरी पोहोचला. प्रभाकरनने पोलिसांना माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
दीपाने Thupparivalan व Vaaitha या चित्रपटांत काम केलं होतं. तिच्या आत्महत्येच्या बातमीने तामिळ फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच तमिळ इंडस्ट्रीत दोन आत्महत्येच्या घटना घडल्या. दीपाच्या आत्महत्येपूर्वी तमिळमधील लोकप्रिय गीतकार कालिबान यांची मुलगी थुरिगाई हिनेही आत्महत्या केली होती. त्यानंतर आता दीपाने गळफास घेत जीवन संपवलं आहे.