साऊथ अभिनेत्री महालक्ष्मी अडकली लग्नबंधनात, लग्नाच्या फोटोंवरून सुरू झाली भलतीच चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 15:50 IST2022-09-02T15:46:27+5:302022-09-02T15:50:17+5:30
Actress Mahalakshmi marries producer Ravinder Chandrasekaran : महालक्ष्मीने तिच्या लग्नाचे फोटो आणि ते क्षणात व्हायरल झालेत. यानंतर काय तर अनेकांनी महालक्ष्मी व तिच्या नवऱ्याला ट्रोल करायला सुरूवात केली...

साऊथ अभिनेत्री महालक्ष्मी अडकली लग्नबंधनात, लग्नाच्या फोटोंवरून सुरू झाली भलतीच चर्चा
साऊथची लोकप्रिय अभिनेत्री महालक्ष्मी ( Mahalakshmi ) विवाहबंधनात अडकली. निर्माता रवींद्र चंद्रशेखरन ( Ravindar Chandrasekaran) यांच्यासोबत तिने लग्नगाठ बांधली. अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा शाही विवाह सोहळा पार पडला. महालक्ष्मीने तिच्या लग्नाचे फोटो आणि ते क्षणात व्हायरल झालेत. यानंतर काय तर अनेकांनी महालक्ष्मी व तिच्या नवऱ्याला ट्रोल करायला सुरूवात केली.
लग्नसोहळ्यात महालक्ष्मीने लाल रंगाची कांजीवरम साडी नेसली होती. सोबत साजेसे पारंपारिक दागिने घातले होते. तर रवींद्रने पाढरा शर्ट आणि पारंपरिक लुंगी परिधान केली होती. महालक्ष्मीने लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. या फोटोला महालक्ष्मीने दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं. ‘मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते की तुझ्यासारखी व्यक्ती माझ्या आयुष्यात आली. तू माझं आयुष्य प्रेमाने व्यापून टाकलं आहेस,’असं कॅप्शन देत महालक्ष्मीने लग्नाचे फोटो शेअर केलेत.
हे फोटो क्षणात व्हायरल झालेत आणि यावरून काही लोकांनी महालक्ष्मी व तिचा पती रवींद्र यांना ट्रोल करायला सुरूवात केली. अनेकांनी दोघांच्या दिसण्यावरून नको त्या कमेंट्स केल्या. महालक्ष्मी सारख्या इतक्या सुंदर अभिनेत्रीने रवींद्रसोबत लग्न केलंच कसं? असा सवाल अनेकांनी केला. काहींनी महालक्ष्मीवर पैशासाठी लग्न केल्याचा आरोपही केला. पैशापुढे सगळं झूठ आहे, अशा कमेंट्स करत लोकांनी तिला ट्रोल केलं.
महालक्ष्मीचं हे दुसरं लग्न आहे. पहिल्या पतीपासून तिला एक मुलगा आहे. महालक्ष्मी ही तामिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिका आणि चित्रपटात काम केलं आहे. व्हिडीओ जॉकी म्हणून तिने आपल्या कारकिदीर्ची सुरुवात केली होती. त्यानंतर ती सिनेसृष्टीत पदार्पण केलं. वाणी रानी, चेल्लामय, अरसी, थिरू मंगलम, यामिरूक्का बयामेन अशा अनेक चित्रपटांत ती झकळली.
तिचा पती रवींद्र चंद्रशेखरन हा तमिळ चित्रपटसृष्टीतील चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक आहे. तो चेन्नईचा रहिवासी असून गेल्या बºयाच वषार्पासून चित्रपटसृष्टीमध्ये सक्रिय आहे. नालनम नंदिनीयम, सुट्टा कधई, मुरुंगकाई चिप्स अशा अनेक चित्रपटाची निर्मिती त्याने केली.