​तमन्ना बनणार तामिळमधील ‘क्वीन’!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2016 05:16 PM2016-11-28T17:16:42+5:302016-11-28T17:16:42+5:30

अभिनेत्री कंगना राणौत हिच्या गाजलेल्या ‘क्वीन’ या चित्रपटाचा तामिळ रिमेक येतोय आणि या रिमेकमध्ये तमन्ना भाटीया हिची वर्णी लागलीय. ...

Tamil to become 'queen' in Tamil | ​तमन्ना बनणार तामिळमधील ‘क्वीन’!

​तमन्ना बनणार तामिळमधील ‘क्वीन’!

googlenewsNext
िनेत्री कंगना राणौत हिच्या गाजलेल्या ‘क्वीन’ या चित्रपटाचा तामिळ रिमेक येतोय आणि या रिमेकमध्ये तमन्ना भाटीया हिची वर्णी लागलीय. म्हणजेच तमन्ना तामिळमधील ‘क्वीन’ बनताना दिसणार आहे. निश्चितपणे या प्रोजेक्टसाठी तमन्ना कमालीची उत्सूक आहे. मी ‘क्वीन’ पाहिलेला नव्हता. पण या चित्रपटाच्या रिमेकमध्ये मी असावी,अशी माझी मनापासून इच्छा होती. याचा रिमेक बनणार वा नाही, हेही मला ठाऊक नव्हते. तरीही ही भूमिका आपल्याच वाट्याला यावी, असे मला वाटत होते. ‘क्वीन’ने सगळ्यांनाच वेड लावले. अशा लोकप्रीय चित्रपटाच्या रिमेकमध्ये मी असणार, यापेक्षा आनंदाची बाब माझ्यासाठी कुठली असेल,असे तमन्ना यावेळी म्हणाली. माझ्याकडे या चित्रपटाची आॅफर आली आणि त्यानंतर मी हा चित्रपट पाहिला. तो पाहिल्यानंतर मी जणू या चित्रपटाच्या प्रेमात पडले,असेही ती म्हणाली.
एकंदर काय तर तमन्नाचा आनंद सध्या गगनात मावेनासा झाला आहे. ‘क्वीन’ या बॉलिवूडपटात कंगना रानौत हिने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटातील भूमिकेसाठी कंगनाला सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. साहजिक कंगनाचा यातील अभिनय बघता ‘क्वीन’ तमन्नावर एक वेगळा दबाव असणार आहे. हा दबाव झुगारून तमन्ना ‘क्वीन’मध्ये किती दमदार अभिनयाचे दर्शन घडवते, तेच आता पाहायचे आहे.
खरे तर सध्या तमन्ना अगदी जोरात आहे. ‘धर्मा धुराई’ य चित्रपटातील भूमिकेसाठी अलीकडे आशिया व्हिजन २०१६मध्ये तमन्नाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरविध्यात आले. ‘देवी’मधील तिच्या अभिनयाचेही वारेमाप कौतुक झाले. यावर्षीच्या सुरुवातीला ‘नागार्जूना’ आणि ‘कर्थी’ हे तिचे चित्रपटही हिट ठरले. लवकरच ती ‘बाहुबली2’मध्ये दिसणार आहे.

Web Title: Tamil to become 'queen' in Tamil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.