अभिमानास्पद! 'गोल्डन ग्लोब'मध्ये घुमला भारताचा आवाज; ‘RRR’ मधील ‘नाटू नाटू’ ठरलं बेस्ट ओरिजनल साँग
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 08:07 AM2023-01-11T08:07:55+5:302023-01-11T08:08:11+5:30
Golden Globe Awards 2023 Live Updates: RRR प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Golden Globe Awards 2023 Live Updates: RRR प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत अनेक पुरस्कार पटकावले आहे. दरम्यान, एसएस राजामौली यांच्या चित्रपटाला दोन श्रेणींमध्ये गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. गोल्डन ग्लोब पुरस्काराचा 80 वं एडिशन अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील बेव्हरली हिल्स येथील बेव्हरली हिल्टन येथे सुरू झाले आहे. एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटातील 'नाटू नाटू या गाण्याला ‘बेस्ट साँग’चा पुरस्कार मिळाला आहे.
एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटातील 'नाटू नाटू’ या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार मिळाला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी ही अभिमानाची बाब आहे. एसएस राजामौली यांच्या 'RRR' चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी दोन श्रेणींमध्ये नामांकन मिळाले. हे नॉन इंग्लिश लॅग्वेज आणि बेस्ट ओरिजनल साँग मोशन पिक्चरसाठी नामांकित झाले आहे. एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटातील 'नाटू नाटू’ हे गाणे 2022 च्या हिट गाण्यांपैकी एक आहे. गाण्याची तेलुगू आवृत्ती ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक एमएम कीरावानी यांनी कंपोज केली होती. काला भैरवा आणि राहुल सिपलीगुंज यांनी हे हिट गाणं लिहिलेय. 2023 च्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी नामांकनांची घोषणा 12 डिसेंबर 2022 रोजी करण्यात आली होती.
Incredible ..Paradigm shift🔥👍😊👌🏻 Congrats Keeravani Garu 💜from all Indians and your fans! Congrats @ssrajamouli Garu and the whole RRR team! https://t.co/4IoNe1FSLP
— A.R.Rahman (@arrahman) January 11, 2023
80 व्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्सचे आयोजन बेव्हरली हिल्स, कॅलिफोर्निया, येथील बेव्हरली हिल्टन येथे होत आहे. या आंतरराष्ट्रीय पुरस्कारामध्ये जगभरातील अनेक चित्रपट आणि कलाकारांना नामांकन मिळालेय. भारतीय चित्रपटसृष्टीच्या वतीने, एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटाला या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये दोन श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे. त्यापैकी सर्वोत्कृष्ट गाण्याच्या श्रेणीत या चित्रपटाने बाजी मारली.