काय सांगता, ऑस्कर जिंकणा-या ‘पॅरासाइट’ने चोरली साऊथ स्टार विजयच्या चित्रपटाची कथा?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 01:26 PM2020-02-12T13:26:47+5:302020-02-12T13:29:07+5:30
तामिळ चाहत्यांचा काय आहे दावा?
नुकताच ऑस्करचा भव्यदिव्य पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात साऊथ कोरियाचा ‘पॅरासाइट’ हा सिनेमा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला. या चित्रपटाने बेस्ट ओरिजनल स्क्रिन प्ले, बेस्ट डायरेक्टर, बेस्ट फिल्म, बेस्ट इंटरनॅशनल फिचर अशा चार ऑस्कर पुरस्कारांवर नाव कोरले. सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळवणारा ‘पॅरासाइट’ हा पहिला परदेशी भाषा चित्रपट ठरला. शिवाय ऑस्करच्या इतिहासात प्रथमच एकाच सिनेमाला बेस्ट इंटरनॅशनल आणि बेस्ट सिनेमा श्रेणीत पुरस्कार मिळाल्याने या सिनेमाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. पण आता चार ऑस्करवर नाव कोरणा-या ‘पॅरासाइट’ची कथा चोरीची असल्याचा दावा केला जात आहे. होय,‘पॅरासाइट’ची कथा साऊथचा अभिनेता विजयच्या ‘मिनसारा कन्ना’ या तामिळ चित्रपटावरून चोरल्याचा दावा तामिळ चित्रपट चाहत्यांनी केला आहे.
#Parasite an unofficial remake of ViJaY anna's ATBB Minasara Kanna has made History at #Oscars@actorvijay got a sixty minutes of standing ovation from the crowd.
— Drogo (@BlackinDisguise) February 10, 2020
Stardom matters.
This is undoubtedly ViJaY anna era
Thala fans **tha ipo vaanga dawww#Oscar2020#Valimaihttps://t.co/FAC0OyFRbTpic.twitter.com/dYhfob6WXP
अनेक चाहत्यांनी ट्वीटरवर हा दावा केला आहे. ‘पॅरासाइट’ हा विजयच्या ‘मिनसारा कन्ना’चा अनऑफिशिअल रिमेक असल्याचा दावा या चाहत्यांनी केला आहे.
साऊथ सुपरस्टार विजयचा ‘मिनसारा कन्ना’ हा सिनेमा 1999 मध्ये रिलीज झाला होता. यात विजयसोबत मोनिका कास्टेलिनो, रंभा, खुशबू सुंदर मुख्य भूमिकेत होते.
काय आहे साम्य?
ऑस्कर जिंकणा-या पॅरासाइटची कहाणी कोरियामध्ये राहणा-या दोन गरीब आणि उच्चभ्रू कुटुंबाची आहे. . दोन्ही कुटुंबांपैकी एक अत्यंत श्रीमंत आहे तर दुसरे गरीब आहे. गरीब कुटुंबातील सदस्य हळूहळू श्रीमंत कुटुंबात दाखल होतात. हे सदस्य वेगवेगळे काम करून श्रीमंत कुटुंबात राहू लागतात. पण आपल्याकडे वेगवेगळे काम करणारे हे सगळे एकाच कुटुंबाचे सदस्य आहेत, हे श्रीमंत कुटुंबाला माहित नसते.
1999 साली आलेल्या विजयच्या ‘मिनसारा कन्ना’ची कथा नेमकी अशीच आहे. चित्रपटात कन्नन (विजय) व इश्वर्या (मोनिका कास्टेलिनो) दोघे प्रेमात पडतात. इश्वर्याची मोठी बहीण इंदिरा देवी (खूशबू) एक श्रीमंत व अहंकारी महिला असते. मात्र ती दोन्ही बहीणी इश्वर्या व प्रिया (रंभा) याच्याप्रती कमालीची प्रोटेक्टिव्ह असते. यानंतर कन्नन स्वत:ची ओळख लपवून त्यांच्या कुटुंबाचा बॉडीगार्ड म्हणून काम करू लागतो. कन्ननचा लहान भाऊ हाही नोकर म्हणून तर बहीण कुक म्हणून इंदिरा देवीच्या कुटुंबात दाखल होतात. आपल्याकडे काम करणारे हे सगळे एकाच कुटुंबाचे सदस्य आहेत हे इंदिरा देवीला माहित नसते. नेमक्या याच आधारावर विजयचे चाहते ‘पॅरासाइट’चा प्लॉट चोरीचा असल्याचा दावा करत आहे.
Watched korean movie #parasite lately & realized that the movie is inspired by @actorvijay 's tamil movie #minsarakanna directed by k.s.ravikumar.Parasite is a worldwide hit,but we made such films long back.#legendksravikumar#parasiteisminsarakanna#ThalapathyVijay#Thalapathy
— Andrew Rajkumar (@iamrajdrew) February 5, 2020
There are very uncanny similarities in the story between the oscar winning movie #Parasite and Vijay’s 1999 Tamil movie Minsara Kanna.
— Rayhan, John (@JohnRayhan) February 10, 2020
चाहत्यांचा दावा पण वेगळ्या आहेत कथा
चाहत्यांनी भलेही दोन्ही चित्रपटांचा प्लॉट सारखा असल्याचा दावा केला आहे. पण प्रत्यक्षात पॅरासाइट व मिनसारा कन्नाच्या कथा वेगळ्या आहेत. मिनसारा कन्ना या तामिळ सिनेमात एका मुलाची व एका श्रीमंत मुलीची प्रेमकथा दाखवली आहे. तर पॅरासाइटमध्ये गरिब व श्रीमंत यांच्यातील अंतर दर्शवले आहेत. पॅरासाइटची कथा डार्क आहे.