सुपरस्टार धनुषचे घर पाहून तुम्हीही म्हणाल,अतिसुंदर, अमेझिंग ,SEE PHOTO
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 17:50 IST2021-02-25T17:43:22+5:302021-02-25T17:50:43+5:30
धनुषला पर्यावरणाची आवड असल्याने त्याने संपूर्ण घरात तशीच छोटे छोटे रोपं लावली आहेत. त्याच्या घराच्या काही भागांत लाकडाची फ्लोरींग केलेली आहे. घराच्या भिंतीवरही काही सुंदर विचार लिहिलेले पाहायला मिळतात.

सुपरस्टार धनुषचे घर पाहून तुम्हीही म्हणाल,अतिसुंदर, अमेझिंग ,SEE PHOTO
तमिळचा सुपरस्टार आणि रजनीकांतचा जावई अशी धनुषची ओळख . मात्र तो आला.. त्यानं गायलं आणि त्यानं जिंकलं... ''वाय धीस कोलावेरी डी'' म्हणत त्यानं देशातच नाहीतर जगभरातल्या संगीतप्रेमींना अक्षरशा वेड लावलं... प्रत्येकजण कोलावेरी डीच्या तालावर बेधुंद झाल्याचं पाहायला मिळालं..
''कोलावेरी डी'' या गाण्याच्या अदभुत यशानंतर रजनीकांतचा जावई अशी ओळख न राहता सारेच त्याला धनुष म्हणून ओळखू लागले.
धनुषच्या दर्जेदार अभिनयाने त्याचे सिनेमे सुपरहिट ठरले. त्याच्या अभिनयाने त्याने रसिकांची पसंती मिळवत आज तो सुपरस्टार धनुष बनला आहे. धनुष त्याच्या आलिशान घरामुळे चर्चेत आला आहे. धनुषचे घर असंच आलिशान आहे. त्याच्या याच घराचे काही फोटो समोर आले आहेत. आलिशान घरावरुन त्याचं जगणंही आलिशान असल्याचे पाहायला मिळेल. घराचं इंटिरीअर सजवण्यासाठी धनुषने बरीच मेहनत घेतली आहे. धनुषचं खरं नाव वेंकेटेश प्रभू कस्तूरी राज आहे. धनुष ७२ कोटींच्या प्रॉपर्टीचा मालक आहे.
धनुषला पर्यावरणाची आवड असल्याने त्याने संपूर्ण घरात तशीच छोटे छोटे रोपं लावली आहेत. त्याच्या घराच्या काही भागांत लाकडाची फ्लोरींग केलेली आहे. घराच्या भिंतीवरही काही सुंदर विचार लिहिलेले पाहायला मिळतात. डायनिंगपासून पूल एरियापर्यंत घराचा कोपरा अन् कोपरा सजवण्यासाठी धनुषने बरीच मेहनत घेतली असून कुणाचंही लक्ष आकर्षित करेल. हे घर पाहून आपसुकच तुमच्या तोंडातून अतिसुंदर, अमेझिंग असे शब्द बाहेर पडले नाही तरच नवल.
धनुषने कधीच अभिनेता बनण्याचा विचार केला नव्हता. त्याला शेफ बनायचे होते. एका मुलाखतीत त्याने सांगितले होते की, शेफ बनण्यासाठी त्याने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करण्याचा विचार केला होता. मात्र त्याच्या भावाने त्याला अभिनय क्षेत्रात करियर करण्यासाठी सांगितले. भावाचे ऐकून त्याने सिनेइंडस्ट्रीत नशीब आजमावण्याचे ठरवले.
रजनीकांत यांच्या मोठ्या मुलीसोबत धनुषने लग्न केले. धनुषपेक्षा रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या दोन वर्ष मोठी आहे. ते दोघे पहिल्यांदा २००३ साली कढाल कोंडीयन या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान भेटले होते. २००४ साली दोघे विवाहबंधनात अडकले. धनुष भगवान शिव यांचा भक्त असून त्याने त्याच्या दोन्ही मुलांची नावे यत्र आणि लिंगा असे ठेवले आहे.