'तान्हाजी: द अनसंग वॉरियर'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये दुसऱ्या दिवशी झाली वाढ, आकडा वाचून व्हाल आनंदित
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 14:00 IST2020-01-12T14:00:00+5:302020-01-12T14:00:02+5:30
दुसऱ्या दिवशी देखील 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूपच चांगले कलेक्शन केले आहे.

'तान्हाजी: द अनसंग वॉरियर'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये दुसऱ्या दिवशी झाली वाढ, आकडा वाचून व्हाल आनंदित
अजय देवगन, सैफ अली खान आणि काजोल स्टारर सिनेमा 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' आणि दीपिका पादुकोण स्टारर 'छपाक' रूपेरी पडद्यावर एकाच दिवशी रसिकांच्या भेटीला आले. दोन्ही सिनेमाने आतापर्यंत चांगली कमाई केली असली तर यांत तान्हाजीने कमाईच्या बाबतीत छपाकला मागे टाकले आहे.
दोन्ही सिनेमांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. तसेच दोन्ही चित्रपटांच्या टीमने आपापल्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले होते. पण तरीही 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' या चित्रपटाला छपाकच्या तुलनेत चांगली ओपनिंग मिळाली असून पहिल्या दिवसाप्रमाणे दुसऱ्या दिवशी देखील या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूपच चांगले कलेक्शन केले आहे.
तान्हाजी या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशीच्या तुलनेत ४० टक्क्यांनी वाढ झाली असून या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी २० करोड रुपये कमावले आहेत.
'तान्हाजी' प्रदर्शित होताच या सिनेमाने अक्षरक्ष: धुमाकुळ घातल्याचे पाहायला मिळाले. या सिनेमाने १५.१० कोटींची कमाई करत दमदार ओपनिंग केली. आतापर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 35 कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे आगामी दिवसांत हा सिनेमा बॉक्स ऑफिसचे सगळे रेकॉर्ड मोडणार असेच दिसतंय. दमदार अॅक्शनचे परिपूर्ण पॅकेज असलेल्या 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' सिनेमामुळे पुन्हा अजयची जादू रसिकांवर झाली असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. हा चित्रपट एकूण 4540 स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आला होता.