Blockbuster Hit ! ‘तान्हाजी’ने तीन आठवड्यांत जमवला इतक्या कोटींचा गल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 03:19 PM2020-01-27T15:19:32+5:302020-01-27T15:20:51+5:30
कमी शो शिवाय ‘पंगा’ व ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’ या सारख्या दोन मोठ्या सिनेमांचे आव्हान असूनही ‘तान्हाजी’ची घोडदौड सुरु आहे.
नरवीर तान्हाजी मालुसरे यांचा पराक्रम सांगणारा ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरची घोडदौड अद्यापही सुरू आहे. तिस-या आठवड्यात पद्मावत, कबीर सिंग, संजू, टायगर जिंदा है, बाहुबली यांसह अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांना कमाईत मागे टाकत ‘तान्हाजी’ने नव्या विक्रमांना गवसणी घातली आहे. विशेष म्हणजे, कमी शो शिवाय ‘पंगा’ व ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’ या सारख्या दोन मोठ्या सिनेमांचे आव्हान असूनही ‘तान्हाजी’ची घोडदौड सुरु आहे.
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ‘तान्हाजी’चे तिस-या आठवड्यांच्या कमाईचे आकडे शेअर केले आहेत. 10 जानेवारीला रिलीज झालेल्या ‘तान्हाजी’ने काल 26 जानेवारीला 12.58 कोटींचा गल्ला जमवत 224.93 कोटींचा पल्ला गाठला.
#Tanhaji versus #Blockbusters on *Third Sunday*...
— taran adarsh (@taran_adarsh) January 27, 2020
⭐️ #Baahubali2#Hindi: 17.75 cr
⭐️ #Dangal: 14.33 cr
⭐️ #Tanhaji: 12.58 cr
⭐️ #PK: 11.58 cr
⭐️ #KabirSingh: 9.61 cr
⭐️ #Sanju: 9.29 cr
⭐️ #Uri: 9.20 cr
⭐️ #BajrangiBhaijaan: 9.07 cr
⭐️ #TigerZindaHai: 8.27 cr
contd.
या ब्लॉकबस्टर चित्रपटांना टाकले मागे
‘तान्हाजी’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकले आहे. प्रदर्शनाच्या तिस-या रविवारच्या कमाईत ‘तान्हाजी’ने पीके (11.58 कोटी), कबीर सिंह (9.61 कोटी), संजू (9.29 कोटी), उरी (9.20 कोटी), बजरंगी भाईजान (9.07 करोड़), टाइगर जिंदा है (8.27 कोटी), पद्मावत (8 कोटी), धूम 3 (5.75 कोटीÞ), वॉर (5.60 कोटी), बाहुबली (5.11 कोटी), सुल्तान (5.14 कोटी) अशा अनेक चित्रपटांना मागे सोडले.
#Tanhaji surpasses all expectations, estimations and calculations... While *most films* struggle to survive after 2 weeks, #Tanhaji is setting new benchmarks in Week 3... [Week 3] Fri 5.38 cr, Sat 9.52 cr, Sun 12.58 cr. Total: ₹ 224.93 cr. #India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) January 27, 2020
अजय देवगणचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
13 व्या दिवशी अजय देवगणच्या ‘तान्हाजी’ने 224.93 कोटी कमाई करत, अजयच्याच चित्रपटाचा विक्रम मोडला. होय, ‘गोलमाल अगेन’ला मागे टाकत ‘तान्हाजी’ अजयचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. ‘गोलमाल अगेन’ने 24 दिवसांत 200 कोटींचा आकडा पार करत 205.69 कोटींची कमाई केली होती.