तनिषा मुखर्जी आणि उदय चोप्राचं या कारणांमुळे झालं ब्रेकअप!, अखेर अभिनेत्रीनं सोडलं मौन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 17:42 IST2024-01-06T17:41:15+5:302024-01-06T17:42:03+5:30
Tanisha Mukharjee And Uday Chopra : अभिनेत्री तनिषा मुखर्जी हिने तिचा एक्स बॉयफ्रेंड उदय चोप्रासोबतचे नाते आणि दोन वर्षे डेटिंग केल्यानंतर ते का वेगळे झाले याबद्दल खुलासा केला.

तनिषा मुखर्जी आणि उदय चोप्राचं या कारणांमुळे झालं ब्रेकअप!, अखेर अभिनेत्रीनं सोडलं मौन
ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांची मुलगी आणि काजोलची धाकटी बहीण तनिषा मुखर्जी झलक दिखला जा या रिएलिटी शोमध्ये आपले नृत्य कौशल्य दाखवत आहे. तिच्या नृत्याव्यतिरिक्त तिने अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. तनिषाने उदय चोप्रासोबत नील 'एन' निक्की या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर तिने सरकार, अंतर आणि वन टू थ्रीसह अनेक चित्रपटांमध्ये काम केले. तिच्या पहिल्या चित्रपटादरम्यान, ती आणि उदय चोप्रा यांच्यासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याच्याही अफवा पसरल्या होत्या. मात्र, बराच काळ रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर ते दोघे वेगळे झाले. आता एका मुलाखतीत तनिषाने उदयसोबतच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे.
तनिषाने खुलासा केला की, उदयची आणि तिची भेट भाऊ आदित्य चोप्राचे पहिले दिग्दर्शन असलेल्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या बॉलिवूड हिट चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. यानंतर तिच्या आणि उदयमध्ये प्रेम फुलू लागले. तनिषा म्हणाली की, उदय आणि माझी भेट 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'च्या वेळी झाली होती आणि त्यादरम्यान आम्ही मित्र झालो आणि आम्ही नेहमीच मित्र होतो. मला वाटते की अशाच चित्रपटांदरम्यान आम्ही जवळ आलो आणि मग आम्ही प्रेमात पडलो.
तनिषा आणि उदय चोप्राचे ब्रेकअप का झाले?
तनिषाला त्यांच्या ब्रेकअपचे खरे कारण विचारण्यात आले. यावर अभिनेत्री म्हणाली, 'त्यांचे नाते दोन वर्षे टिकले आणि काही गोष्टी त्यांच्यासाठी काम करत नसल्यामुळे त्यांचे ब्रेकअप झाले. अभिनेत्रीने असेही शेअर केले की ब्रेकअप तिच्यासाठी भावनिकदृष्ट्या खूप कठीण होते. मात्र, तनिषाने खुलासा केला आहे की, ते दोघे अजूनही मित्र आहेत.