Tanushree Dutta Controversy : तनुश्री दत्ताने राखी सावंतवर ठोकला १० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 09:45 IST2018-10-22T09:43:30+5:302018-10-22T09:45:46+5:30
\‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर ‘त्या’ दिवशी तनुश्री आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये ड्रग्जच्या नशेत बेशुद्ध होऊन पडली होती, असा दावा राखी सावंतने केला होता.

Tanushree Dutta Controversy : तनुश्री दत्ताने राखी सावंतवर ठोकला १० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
तनुश्री दत्ता-नाना पाटेकर वादाला आता एक नवी कलाटणी मिळाली आहे. होय, तनुश्रीने नाना पाटेकर यांच्याविरोधात गैरवर्तनाचा आरोप केल्यानंतर अनेकांनी या वादात उडी घेतली होती. यापैकी कुणी तनुश्रीची पाठराखण केली होती तर कुणी नाना पाटेकर यांना पाठींबा दिला होता. नानाची बाजू घेणाºयांमध्ये इंडस्ट्रीची ड्रामा क्विन राखी सावंत सगळ्यात पहिली होती. नानाची बाजू राखताना आणि त्याचवेळी तनुश्रीवर आरोप करताना राखी नाही- नाही ते बरळली होती. ‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर ‘त्या’ दिवशी तनुश्री आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये ड्रग्जच्या नशेत बेशुद्ध होऊन पडली होती, असा दावा तिने केला होता. या दाव्यानंतर तनुश्रीने जोरदार प्रतित्त्युर देत, राखी विरोधात १० कोटींचा अबु्रनुकसानीचा दावा ठोकला आहे.
‘हॉर्न ओके प्लीज’च्या गाण्याच्या शूटवेळी नाना पाटेकर यांनी माझ्याशी गैरवर्तन केले, असा आरोप तनुश्री दत्ताने केला आहे. ज्या गाण्याच्या शूटवेळी ही घटना घडली होती, ते गाणे नंतर राखी सावंतने केले होते. तनुश्रीने गाणे शूट करण्यास नकार दिल्यावर ऐववेळी यात राखीची वर्णी लागली होती. त्यामुळे अलीकडे या संपूर्ण घटनेसंदर्भात राखीने विस्ताराने सांगितले होते. शिवाय घटनेवेळी तनुश्री ड्रग्जच्या नशेत होती, असा खळबळजनक आरोपही केला होता.
काय म्हणाली होती राखी
‘त्या दिवशी मी घरी बसले असताना मला मास्टरजीचा(गणेश आचार्य) फोन आला. राखी, लवकर सेटवर ये. तुला गाणे करायचे आहे, असे ते मला म्हणाले. मी त्यांना गाणे पाठवण्याची विनंती केली. यावर तू फक्त ये. मी गाणे करतोय ना, मग तुला काय करायचे, असे ते मला म्हणाले. त्यांच्या फोननंतर मला नाना पाटेकर यांचाही फोन आला. त्यांनीही मला सेटवर लवकर पोहोचण्यास सांगितले. यानंतर मी घाईघाईत सेटवर पोहोचले. पण सेटवरचे चित्र पाहून मला धक्काचं बसला. काय झाले, हे कळायला मार्ग नव्हता. तिथे मेकअप व्हॅन होती. खूप सारे लोक होते़ मीडिया होता़ तोडफोडही झालेली दिसत होती. मी गणेश आचार्य यांना विचारले तर हे गाणे तनुश्रीचे होते. आम्ही थोडे शूट केलेही. पण आता ती कोआॅपरेट करत नाहीये, असे त्यांनी मला सांगितले. यानंतर मी कॉल करून बघते, असे म्हणून तनुश्रीला कॉल केला. पण तिने माझा कॉनही उचलला नाही़. त्यावेळी डेजी शाह गणेश आचार्य यांची अस्टिस्टंट होती. तिनेचं मला सगळे काही सांगितले. डेजी स्वत: १० वेळा तनुश्रीला बोलवायला गेली होती. पण तिने आपल्या व्हॅनिटी व्हॅनचा दरवाजा उघडला नाही. यानंतर तनुश्रीच्या मेकअप आर्टिस्टने मला सांगितले की, तनुश्री ३-४ तासांपासून बेशुद्ध आहे. मी का? असे त्याला विचारले असता ती ड्रग्ज घेऊन बेशुद्ध पडली असल्याचे त्याने मला सांगितले, ’असे राखीने सांगितले होते.