तापसी पन्नूने बहीण शगुनसोबत केले ‘हे’ कठीण योगा आसन; शेअर केला फोटो...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 06:01 PM2020-06-14T18:01:10+5:302020-06-14T18:05:33+5:30
घरी बसून आता सेलिब्रिटींनाही चांगलाच कंटाळा आलेला आहे. कुणी कुकिंग करतंय तर कुणी गार्डनिंग...यात दाक्षिणात्य सौंदर्यवती तापसी पन्नूही मागे नाही. तिने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
जगभरात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन सुरू आहे. सेलिब्रिटींकडेही आता घरातच बसण्याशिवाय काही दुसरा पर्याय नाही. प्रत्येक जण आपल्या छंद आणि आवडीनिवडी जोपासण्याकडे लक्ष देत आहे. आता हेच बघा ना, अभिनेत्री तापसी पन्नू हिने तिची बहीण शगुनसोबत एक अत्यंत कठीण योगा पोझ केली. बघा तुम्हाला जमतेय का अशी पोझ?
घरी बसून आता सेलिब्रिटींनाही चांगलाच कंटाळा आलेला आहे. कुणी कुकिंग करतंय तर कुणी गार्डनिंग...यात दाक्षिणात्य सौंदर्यवती तापसी पन्नूही मागे नाही. तिने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात ती तिची बहीण शगुनसोबत योगा करताना दिसतेय. तिने अत्यंत कठीण प्रकारातील योगाचे आसन केले आहे. त्या दोघींच्या बॉडीवरचे कर्व्हज पाहून लक्षात येतेय की, ते किती कठीण आसन आहे. तिने या फोटोला कॅप्शन दिले आहे की, ‘घर हे असे ठिकाण आहे जिथे व्यक्तीचे हृदय वास करते.’
तापसी पन्नू ही अत्यंत चुलबूली अभिनेत्री असून तिला आयुष्यातील प्रत्येक क्षण एन्जॉय करावे वाटतात. ती लॉकडाऊनमध्ये सोशल मीडियावर बऱ्यापैकी अॅक्टिव्ह असलेली दिसली. तिने अशात अनेक तिचे जुने-नवे फोटो, व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया अकाऊंटसवर पोस्ट केले. तिने मध्यंतरी मजुरांच्या घर वापसीवर कविताही शेअर केली होती.