तापसी पन्नूला करायचंय या व्यक्तीच्या बायोपिकमध्ये काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 17:32 IST2020-02-06T17:32:19+5:302020-02-06T17:32:40+5:30
तापसी पन्नूने या व्यक्तीच्या बायोपिकमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

तापसी पन्नूला करायचंय या व्यक्तीच्या बायोपिकमध्ये काम
बॉलिवूडची पिंक गर्ल म्हणजेच अभिनेत्री तापसी पन्नू नेहमी वेगवेगळ्या भूमिका साकारताना दिसत असते. शेवटची ती 'सांड की आँख' चित्रपटात पहायला मिळाली होती. यात तिने शार्प शूटर दादीची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता ती थप्पड चित्रपटात दिसणार आहे.
'थप्पड' या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटातील 'थप्पड़। बस इतनी सी बात?' या डायलॉगने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
त्यातच आता तापसीने अमृता प्रीतम यांच्या बायोपिकमध्ये अमृताची भूमिका साकारण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. थप्पडमधील तिचे नाव 'अमृता' वरूनच प्रेरित आहे.
'थप्पड' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अभिनेत्री तापसी पन्नूने एक अशी महिला साकारली आहे जी आपल्या पतीद्वारे घरगुती हिंसेची शिकार झाल्यानंतर न्यायाची लढाई लढते. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाच्या क्रेडिट्समध्ये आपल्या नावासोबत आपल्या आईचे नाव जोडून आपल्या आईला आणि सर्व महिलांना आगळी वेगळी आदरांजली वाहिली आहे. तसेच या चित्रपटातून घरगुती हिंसेला सहन करू नका असा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात येत आहे.
थप्पड चित्रपटात तापसी पन्नू, रत्ना पाठक शाह, मानव कौल, दीया मिर्जा, तन्वी आझमी आणि राम कपूर हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
हा चित्रपट २८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.