इंडस्ट्री सोडून विदेशात स्थायिक झाली मराठमोळी अभिनेत्री; 'या' क्षेत्रात कमावतीये नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 03:11 PM2024-02-05T15:11:07+5:302024-02-05T15:11:28+5:30

Bollywood actress: 2001 मध्ये रिलीज झालेला स्टाइल हा सिनेमा आठवतो का? या सिनेमात तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

tara-deshpande-leave-bollywood-now-became-cook-boston | इंडस्ट्री सोडून विदेशात स्थायिक झाली मराठमोळी अभिनेत्री; 'या' क्षेत्रात कमावतीये नाव

इंडस्ट्री सोडून विदेशात स्थायिक झाली मराठमोळी अभिनेत्री; 'या' क्षेत्रात कमावतीये नाव

मराठी कलाविश्वात आज असे अनेक कलाकार आहेत जे अभिनयासह अन्य क्षेत्रातही आपलं नशीब आजमावत आहेत. यात काही असेही कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या उद्योग व्यवसायासाठी चक्क कलाविश्वाला रामराम ठोकला. सध्या सोशल मीडियावर अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे जिने कलाविश्वातून काढता पाय घेत चक्क विदेशात तिचा नवा व्यवसाय सुरु केला आहे.

२००१ मध्ये रिलीज झालेला स्टाइल हा सिनेमा आठवतो का? या सिनेमात तारा देशपांडे (Tara Deshpande)  या मराठमोळ्या अभिनेत्रीने निक्की मल्होत्रा ही भूमिका साकारली होती. ताराने १९९६ मध्ये तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. मात्र, स्टाइल या सिनेमामुळे तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. परंतु, या सिनेमानंतर ती मोजक्या काही सिनेमांमध्ये झळकली. आणि, त्यानंतर तिने इंडस्ट्रीतून काढता पाय घेतला.


या गाजलेल्या सिनेमात केलं ताराने काम

स्टाइलनंतर ती बॉम्बे, बॉइज, बडा दिन, शक्ती, तपिश यांसारख्या काही मोजक्या सिनेमात झळकली. त्यानंतर ती अचानक कलाविश्वातून गायब झाली.

सध्या कुठे आहे तारा? कोणत्या क्षेत्रात आहे कार्यरत?

कलाविश्वातून ब्रेक घेतल्यानंतर तारा कायमस्वरुपी अमेरिकेत स्थायिक झाली. अमेरिकेमध्ये बोस्टन येथे ती राहते. विशेष म्हणजे बोस्टनमध्ये तिचं स्वत: केटरिंग एजन्सी आहे. सोबतच ती सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून कायम तिचे कुकिंग व्हिडीओ नेटकऱ्यांसोबत शेअर करत असते.

दरम्यान, ताराने कलाविश्वापासून पूर्णपणे फारकत घेतली असून ती तिचा बिझनेस नेटाने चालवत आहे. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या ताराचे इन्स्टाग्रामवर 44.5k फॉलोअर्स आहेत.

Web Title: tara-deshpande-leave-bollywood-now-became-cook-boston

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.