'गदर 3'वर मोठी अपडेट! तिसऱ्या भागात तारासिंग पाकिस्तानात जाणार नाही, अनिल शर्मांनी केला स्टोरी लाइनचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 09:19 PM2023-09-19T21:19:24+5:302023-09-19T21:20:13+5:30

चित्रपट दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी 'गदर-3' संदर्भात एक महत्त्वाची माहिती शेअर केली आहे...

Tara Singh will not go to Pakistan in Gadar 3, Anil Sharma reveals the story line | 'गदर 3'वर मोठी अपडेट! तिसऱ्या भागात तारासिंग पाकिस्तानात जाणार नाही, अनिल शर्मांनी केला स्टोरी लाइनचा खुलासा

'गदर 3'वर मोठी अपडेट! तिसऱ्या भागात तारासिंग पाकिस्तानात जाणार नाही, अनिल शर्मांनी केला स्टोरी लाइनचा खुलासा

googlenewsNext

'गदर-2' सुपर-डुपर हिट ठरला आहे. सनी देओल आणि अमिषा पटेल यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 520.80 कोटींची, तर जगभरात बॉक्स ऑफिसवर 679.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'गदर 2'च्या यशानंतर आता प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे ती, 'गदर 3'ची. यातच आता, चित्रपट दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी 'गदर-3' संदर्भात एक महत्त्वाची माहिती शेअर केली आहे.

गदर-3 मध्ये पाकिस्तानचा अँगल नसणार - 
'गदर' आणि 'गदर-2'चे दिग्दर्शक अनिल शर्मा झूमला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, 'गदर 3' मध्ये पाकिस्तानचा अँगल असणार नाही. तिसऱ्या भागात तारासिंग पाकिस्तानात जाणार नाही. पाकिस्तानचा अपमान करायची आमची इच्छा नाही. आतापर्यंत आलेल्या दोन्ही गदरमध्ये पाकिस्तानचा अँगल असणे, हा निव्वळ एक योगा-योग आहे. मात्र आता तिसऱ्या भागात असे होणार नाही. पाकिस्तानला यशाचा फॉर्म्युला बनविण्याची आमची इच्छा नाही. तसेच, लोकांनी आम्हाला पाकिस्तानविरोधी समजावे, अशी आमची इच्छा नाही. कारण आम्ही तसे नाही, असेही शर्मा म्हणाले.

असे असतील गदर-3 चे स्टार कास्ट -
तसेच आणकी एका मुलाखतीत अनिल शर्मा यांनी सांगितले होते की 'गदर 3' मध्येही सेम स्टार कास्ट्स राहतील. आम्ही गदर-3, 'गदर' आणि 'गदर 2' च्या तुलनेत अधिक मोठ्या लेव्हलवर तयार करू. पहिल्या आणि दुसऱ्या पार्टप्रमाणेच तिसऱ्या पार्टमध्येही सनी देओलच असेल. तसेच, तिसऱ्या पार्टमध्ये आम्ही सनी देओलचा हँड पंप उखडतानाचा सीनही दाखवणार आहोत.'
 

Web Title: Tara Singh will not go to Pakistan in Gadar 3, Anil Sharma reveals the story line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.