फोटोत दिसणारी बोलक्या डोळ्यांची ही मुलगी आज करतेय बॉलिवूडवर राज्य!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 03:46 PM2020-05-19T15:46:58+5:302020-05-19T16:31:16+5:30
हिचा फोटो पाहून अनेकांना तैमूरची आठवण आली असेल.
तारा सुतारिया आता बॉलिवूडची स्टार आहे. करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’मधून बॉलिवूड डेब्यू करणारी तारा पहिल्याच चित्रपटानंतर चर्चेत आली.ताराने स्वत: हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो तिच्या बालपणीचा आहे. ताराचे बोलके डोळे आणि चेहऱ्यावरचा निष्पाप भाव लोकांना कमालीचा भावला आहे.
‘द सूट लाईफ ऑफ करण अॅण्ड कबीर’ या बच्चे कंपनीसाठी असलेल्या डिज्नी शोमध्ये ताराने विन्नीची भूमिका साकारली होती. यावेळी ती १४-१५ वर्षांची होती. डिज्नीचा सर्वात मोठा चित्रपट ‘अलादीन’मध्ये प्रिन्सेस जॅस्मिनची भूमिका तिच्याकडे चालून आली. पण बोलणी फिस्कटली आणि ताराच्या हातून ही भूमिका निसटली. यानंतर करण जोहरचा ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ तिला मिळाला. तारा एक अभिनेत्री असण्यासोबत एक गायिकाही आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून तारा आणि करिना कपूरचा चुलत भाऊ आदर जैन या दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा आहे. तारा व आदर दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झालेत. साहजिकच यानंतर तारा व आदर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. आदरचा मोठा भाऊ अरमान जैन याच्या रोका सेरेमनीत तारा दिसली आणि या चर्चांना आणखी बळ मिळाले.