फोटोतील ही क्यूट मुलगी आज आहे बॉलिवूडची ग्लॅमरस अॅक्ट्रेस, तुम्ही ओळखलंत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 10:35 IST2022-01-28T08:00:00+5:302022-01-28T10:35:01+5:30
Guess Who: फोटोतील या क्यूट चिमुरडीला कधीकाळी तुम्ही टीव्हीवर बघितलं असेल. ती मोठी झाली आणि बॉलिवूडमध्ये तिचा धमाकेदार डेब्यू झाला.

फोटोतील ही क्यूट मुलगी आज आहे बॉलिवूडची ग्लॅमरस अॅक्ट्रेस, तुम्ही ओळखलंत?
फोटोतील या क्यूट चिमुरडीला कधीकाळी तुम्ही टीव्हीवर बघितलं असेल. ती मोठी झाली आणि बॉलिवूडमध्ये तिचा धमाकेदार डेब्यू झाला. फार कमी वेळात तिने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. लवकरच ही चिमुरडी कपूर घराण्याची सदस्य होणार आहे. आता याऊपरही तुम्ही या चिमुकलीला ओळखू शकणार नसाल तर आम्हीच तिचं नाव सांगतो.
फोटोतील ही क्यूट चिमुकली दुसरी कुणी नसून बॉलिवूड स्टार तारा सुतारिया (Tara Sutaria ) आहे. तारा गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. दीर्घकाळापासून ती आदर जैनला डेट करतेय. आदर व तारा यांचं लग्न झालंच तर करिना कपूर ताराची नणंद बाई बनेल. कपूर व जैन कुटुंबाच्या अनेक फॅमिली फंक्शनमध्ये तारा दिसते. तारा व आदर जैनची पहिली भेट 2018 मध्ये एका दिवाळी पार्टीत झाली होती. या पहिल्याच भेटीत दोघं चांगले मित्र बनले आणि पुढे प्रेमात पडले.
द सूट लाईफ ऑफ करण अॅण्ड कबीर या बच्चे कंपनीसाठी असलेल्या डिज्नी शोमध्ये ताराने विन्नीची भूमिका साकारली होती. अगदी अलीकडे डिज्नीचा सर्वात मोठा चित्रपट ‘अलादीन’मध्ये प्रिन्सेस जॅस्मिनची भूमिका तिच्याकडे चालून आली. पण बोलणी फिस्कटली आणि ताराच्या हातून ही भूमिका निसटली. यानंतर 2019 मध्ये करण जोहरचा ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ तिला मिळाला. तारा एक अभिनेत्री असण्यासोबत एक गायिकाही आहे. ती नृत्यातही पारंगत आहे.