Tara Sutaria: आदर जैनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर डिनर डेटवर गेली तारा सुतारिया, म्हणाली-मी फक्त तुझ्याबद्दल....
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 09:12 AM2023-01-14T09:12:46+5:302023-01-14T09:18:24+5:30
तारा भविष्यात कपूर कुटुंबाची सून होणार, अशी चर्चा असतानाच तारा व आदरचं ब्रेकअप झालं.
Tara Sutaria-Aadar Jain: तारा सुतारि(Tara Sutaria) याने ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर ती ‘मरजावा’ या चित्रपटातही झळकली. अलीकडे रिलीज झालेल्या ‘एक विलेन रिटर्न्स’मध्ये ती दिसली होती. तारा सुतारिया तिच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असते. अलिकडेच तारा आणि आदर जैन(Aadar Jain)चं ब्रेकअप झालं आहे. याच दरम्यान तारा सुतारियाचा लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यात ती रोमाँटिक कॅंडल लाईट डिनरला गेलेली दिसतेय.
ब्रेकअपनंतर तारा गेली डेटवर
तारा व आदर सर्रास एकत्र दिसायचे. अगदी कपूर कुटुंबाच्या प्रत्येक इव्हेंटमध्ये आदरसोबत तारा दिसायची. अगदी आलिया व रणबीरच्या लग्नातही ताराने हजेरी लावली होती. त्यामुळे हे नातं लग्नापर्यंत पोहोचेल, असाच सगळ्यांचा अंदाज होता. पण झालं भलतंच. तारा भविष्यात कपूर कुटुंबाची सून होणार, अशी चर्चा असतानाच तारा व आदरचं ब्रेकअप झालं.
अलीकडेच तारा सुतारियाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर नवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तारा कँडल लाईट डिनर डेटवर गेलेली दिसतेय. फोटोंमध्ये तारा खूपच सुंदर दिसत आहे., या फोटोंना कॅप्शन देताना ताराने नॅट किंग कोलच्या 'द व्हेरी थॉट ऑफ यू' या प्रसिद्ध गाण्याची ओळ लिहिली आहे. ज्यामध्ये तारा सुतारियाने लिहिले आहे की- मी फक्त तुझ्याबद्दल विचार केला आणि मी छोट्या गोष्टी विसरले..
तारा सुतारिया (Tara Sutaria)चे हे फोटो पाहिल्यानंतर आदर जैननंतर तारा आता कोणासोबत डिनर डेटवर गेली असल्याची चर्चा रंगली आहे. तारा सुतारियाने इन्स्टा पोस्टवर याचा खुलासा केला नसला तरी, इन्स्टा स्टोरीमध्ये ताराने सांगितले आहे की ती तिची मैत्रिण श्रद्धा इंदर मेहतासोबत डिनर डेटवर आली आहे.