Photo Viral : हा चेहरा पाहून अनेकांना झाली तैमूर खानची आठवण; ओळखा कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 13:49 IST2019-05-29T13:48:49+5:302019-05-29T13:49:58+5:30
फोटोतील हा चेहरा पाहून अनेकांना तैमूर खानची आठवण झाली. पण हा फोटो तैमूरचा नाही तर बॉलिवूडमध्ये नुकत्याच पदार्पण करणाऱ्या एका अभिनेत्रीचा आहे.

Photo Viral : हा चेहरा पाहून अनेकांना झाली तैमूर खानची आठवण; ओळखा कोण?
फोटोतील हा चेहरा पाहून अनेकांना तैमूर खानची आठवण झाली. पण हा फोटो तैमूरचा नाही तर बॉलिवूडमध्ये नुकत्याच पदार्पण करणाऱ्या एका अभिनेत्रीचा आहे. हा फोटो आहे, तारा सुतारियाचा. होय, तीच ती ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ या चित्रपटातून डेब्यू करणारी ग्लॅमरस तारा.
ताराने स्वत: हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो तिच्या बालपणीचा आहे. ताराचे बोलके डोळे आणि चेहºयावरचा निष्पाप भाव लोकांना कमालीचा भावला आहे. ताराचा हाच फोटो पाहून अनेकांना तैमूरची आठवण झाली.
‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ रिलीज झाल्यापासून तारा चर्चेत आहे. ताराच्या पहिल्या चित्रपटाला म्हणावे तसे यश मिळाले नाही. पण यातील ताराचा ग्लॅमरस अंदाज सगळ्यांनाच आवडला.
‘द सूट लाईफ ऑफ करण अॅण्ड कबीर’ या बच्चे कंपनीसाठी असलेल्या डिज्नी शोमध्ये ताराने विन्नीची भूमिका साकारली होती. यावेळी ती १४-१५ वर्षांची होती. अगदी अलीकडे डिज्नीचा सर्वात मोठा चित्रपट ‘अलादीन’मध्ये प्रिन्सेस जॅस्मिनची भूमिका तिच्याकडे चालून आली. पण बोलणी फिस्कटली आणि ताराच्या हातून ही भूमिका निसटली. यानंतर करण जोहरचा ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ तिला मिळाला.
तारा एक अभिनेत्री असण्यासोबत एक गायिकाही आहे. लवकरच ती ‘मरजावां’ या चित्रपटात दिसणार आहे. यात ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे. याशिवाय अहान शेट्टीसोबत ‘आर एक्स 100’ हा चित्रपटही तिने साईन केला आहे. या चित्रपटातील काही गाणी तारा स्वत: गाणार आहे.
अलीकडे एका मुलाखतीत तारा स्वत:बद्दल बोलली होती. मी थोडी आंटी टाईप मुलगी आहे. काही दिवसांपूर्वी मला इन्स्टाग्राम समजले. टिष्ट्वटर तर माझ्या डोक्यावरून जाते. लोक सोशल मीडियावर इतके अॅक्टिव्ह कसे राहतात, हेच मला कळत नाही, असे ती म्हणाली होती.