तापसी पन्नू व भूमी पेडणेकर झळकणार 'ह्या' सिनेमात एकत्र, शूटिंगला लवकरच करणार सुरूवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 17:00 IST2019-02-09T17:00:00+5:302019-02-09T17:00:00+5:30
तापसी पन्नू व भूमी पेडणेकर एकत्र रुपेरी पडद्यावर काम करताना दिसणार आहेत. ही माहिती खुद्द त्या दोघींनी सोशल मीडियावर दिली आहे.

तापसी पन्नू व भूमी पेडणेकर झळकणार 'ह्या' सिनेमात एकत्र, शूटिंगला लवकरच करणार सुरूवात
ठळक मुद्देजगातील एका वयस्कर शार्पशूटर महिलेवर आधारीत सिनेमात दिसणार तापसी व भूमी
पिंक फेम अभिनेत्री तापसी पन्नूने नुकतेच 'मिशन मंगल' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. काही दिवसांपूर्वी तिने या चित्रपटातील आपली एक झलक शेअर करत याबद्दलची माहिती दिली. आता यापाठोपाठ तापसी लवकरच आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत भूमी पेडणेकरदेखील झळकणार आहे.
तापसी पन्नू व भूमी पेडणेकरने सोशल मीडियावर फोटो शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या शूटिंगसाठी तापसी आणि भूमी एका गावात पोहोचल्या आहेत. चित्रपटाचा बहुतेक भाग याच गावात शूट होणार असल्याचे म्हटले जात आहे. जगातील एका वयस्कर शार्पशूटर महिलेवर या चित्रपटाची कथा आधारीत असून या महिलेच्या भूमिकेत तापसी दिसणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि कथा तुषार हिरानंदानी यांची असणार असून अनुराग कश्यप आणि निधी परमार याची निर्मिती करणार आहेत. पुढील आठवड्यात चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याची माहिती तरण आदर्श यांनी दिली आहे.
भूमी पेडणेकरने फोटो शेअर करून लिहिले की,' ओल्ड इज गोल्ड आणि हे निश्चितच गोल्ड आहे. मी खूप उत्सुक आहे कारण जगातील सर्वात वयस्कर शार्पशूटर महिलेवर आधारीत सिनेमाचे शूटिंग करत आहे. '
भूमी पेडणेकरचा आगामी सिनेमा सोन चिरेया लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.