टीम इंडियाचं गदरस्टाईल अभिनंदन; तारासिंगने शेअर केलीय खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 07:18 PM2023-09-13T19:18:44+5:302023-09-13T19:25:15+5:30

सनी देओलने भारतीय संघाच्या विजयाला गदर २ सिनेमासोबत जोडून पोस्ट केलीय.

Team India's gathering style congratulations; Tara Singh shared a special post after win on pakistan | टीम इंडियाचं गदरस्टाईल अभिनंदन; तारासिंगने शेअर केलीय खास पोस्ट

टीम इंडियाचं गदरस्टाईल अभिनंदन; तारासिंगने शेअर केलीय खास पोस्ट

googlenewsNext

मुंबई - चित्रपटप्रेमी आणि क्रिकेट चाहत्यांसाठी सध्या मनोरंजनाचा डबल धमाका सुरू आहे. बॉलिवूड स्टारचे २ चित्रपट सुपरहीट ठरले असून सनी देओलच्या गदर २ ने रेकॉर्डब्रेक कमाई केली. तर, शाहरुख खानचा जवानही कमाईचे विक्रम रचत आहे. त्यातच, आशिया कप स्पर्धेत भारताने जोरदार प्रदर्शन करत देशावासीयांना गिफ्ट दिलंय. भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवल्यानंतर श्रीलंकेचा पराभव करत आशिया कपच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवलाय. टीम इंडियाच्या या विजयाचं सनी देओलने गदरस्टाईल अभिनंदन केलंय. 

सनी देओलने भारतीय संघाच्या विजयाला गदर २ सिनेमासोबत जोडून पोस्ट केलीय. गदर २ च्या यशामुळे सनी देओलसह चित्रपटाची सर्वच टीम खुश असून नुकतीच त्यांची सक्सेस पार्टीही झाली. त्यातच, भारतीय संघाने पाकिस्तानवर मोठा विजय मिळवत देशावीयांची कौतुकाची थाप मिळवली. मग, बॉलिवूड सेलिब्रटीही टीम इंडियाचं अभिनंदन करताना दिसत आहेत. सुनिल शेट्टीने दोन दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवरुन टीम इंडियासह विराट कोहली आणि जावई लोकेश राहुलचं अभिनंदन केलं होतं. आता, सनी देओलनेही तारासिंगस्टाईल टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे. 

सनीने अधिकृत  इंस्टाग्राम अकाऊंटवरुन टीम इंडियाच्या काही खेळाडूंचे फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये, पहिला फोटो कर्णधार रोहित शर्माचा असून त्यात कुलदीप यादवची गळाभेट दिसून येते. तर, सनी देओलने दुसरा व्हिडिओ शेअर केला आहे, त्यामध्ये, तारासिंग पाकिस्तानी लोकांना घाबरवताना हँडपंप (हापसा) उखडून टाकताना दिसत आहे. त्यासह, एका आणखी फोटोत विराट कोहली व के.एल. राहुल हे शतकवीर गळाभेट घेताना दिसत आहेत. या फोटोसह सनी देओलने कॅप्शन लिहिलं आहे की, 

मॅच टीव्हीवर असो किंवा गदर २ सिनेमागृहात, हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा, बहुत शानदार बॉइज. या विजयाचं सेलिब्रेशन करा, तारासिंगकडून भारतीय संघाचं अभिनंदन.. असे सनी देओलने म्हटले आहे.

Web Title: Team India's gathering style congratulations; Tara Singh shared a special post after win on pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.