अभिषेक बच्चनच्या 'द बिग बुल'चा टीझर प्रदर्शित, या दिवशी चित्रपट येणार भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 05:58 PM2021-03-16T17:58:27+5:302021-03-16T17:59:02+5:30
द बिग बुल या चित्रपटाच्या टीझरला मिळतोय चांगला प्रतिसाद
हर्षद मेहताच्या आयुष्यावर आधारीत नुकतीच द स्कॅम १९९२ ही वेबसीरीज प्रदर्शित झाली होती. आता हर्षद मेहताच्या आयुष्यावर चित्रपट येत आहे. अभिषेक बच्चनची मुख्य भूमिका असून ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
हर्षद मेहताच्या जीवनावर आधारीत द बिग बुल या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत आहे. टीझरची सुरूवात अजय देवगणच्या आवाजाने होते. व्हिडीओत १९८७ सालची मुंबई दाखवण्यात आली आहे आणि तेव्हा अभिषेक बच्चनची एन्ट्री होते. बॅकग्राउंडला अजय देवगणचा आवाज ऐकू येतो की छोट्या घरात जन्माला येणाऱ्याला नेहमी मोठे स्वप्न पाहण्यासाठी जग विरोध करते. त्यासाठी तो स्वतःचे जग उभारतो. चित्रपटाचा टीझर खूप दमदार आहे आणि प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. हा टीझर रिलीज होताच आता लाखों व्ह्युज मिळत आहे.
अभिषेक बच्चनला या व्यक्तिरेखेत पाहून प्रेक्षकांना गुरू चित्रपटातील त्याची भूमिका डोळ्यासमोर येते आहे. गुरू चित्रपटात अभिषेकने एका उद्योजकाची भूमिका बजावली होती. गुरू हा चित्रपट धीरुभाऊ अंबानी यांच्या जीवनावर आधारित होता असे म्हटले जात होते.
मोठ्या कालावधीनंतर अभिषेक बच्चन एका मोठ्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी अभिषेक बच्चनने द ब्रिथ या वेबसीरीजमध्ये काम केले होते. तर हल्लीच ल्युडो हा नेटफ्लिकवरी सिनेमाही गाजला होता.
द बिग बुल हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार नसून डिस्ने हॉटस्टारवर ८ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.