दिवाळीत रजनीकांतचा मोठा धमाका, 'लाल सलाम' सिनेमाचा दमदार टीझर पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 05:12 PM2023-11-12T17:12:53+5:302023-11-12T17:22:02+5:30

लाल सलाम' या चित्रपटाचा  टीझर दिवाळीच्या दिवशी रिलीज करण्यात आला आहे.

teaser of Rajinikanth's big hit 'Lal Salaam' is out on Diwali | दिवाळीत रजनीकांतचा मोठा धमाका, 'लाल सलाम' सिनेमाचा दमदार टीझर पाहिलात का?

दिवाळीत रजनीकांतचा मोठा धमाका, 'लाल सलाम' सिनेमाचा दमदार टीझर पाहिलात का?

 सुपसुपरस्टार रजनीकांत यांना कोणत्याच विशेष ओळखीची गरज नाही. त्यांचे चित्रपट लार्जर दॅन लाइफ असतात. रजनीकांत यांच्या चाहत्यांची दिवाळी धुमधडाक्यात होणार आहे. कारण, बहुचर्चित  'लाल सलाम' या चित्रपटाचा  टीझर दिवाळीच्या दिवशी रिलीज करण्यात आला आहे.

लाल सलाम' या चित्रपटाचे दिग्दर्शन रजनकांत यांची मुलगी ऐश्वर्या हिने केले आहे. टीझरची सुरुवात एका क्रिकेट सामन्याने होते. रजनकांत मोईदीन भाईच्या भूमिकेत आहे. टीझरमध्ये ते ग्रँड एन्ट्री करताना आणि गुंडांशी लढताना दाखवले आहेत. टीझरनंतर चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. 

 'लाल सलाम' चित्रपटात विष्णू विशाल आणि विक्रांत मुख्य भूमिकेत आहेत. तर रजनीकांत आणि कपिल देव यांचा कॅमिओ आहे. मे महिन्यात रजनीकांत आणि कपिल देव एकत्र चित्रपटाचे शूटिंग करताना दिसले होते. यापुर्वी या सिनेमाचं पोस्टरही रीलिज करण्यात आलं होतं.  या सिनेमातील गाणी एआर रहमान संगीतबद्ध करणार आहेत.

सुपरस्टार रजनीकांत यांचे देशातच नाही तर विदेशातही मोठे चाहते आहेत. ते कायमच थलैवाच्या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक असतात. रजनीकांत सध्या त्यांच्या 'जेलर' चित्रपटामुळे चर्चेत आहेत.  रजनीकांत याआधी २०२१ मध्ये 'दरबार' आणि 'अन्नात्थे' या सिनेमात दिसले होते. रस्टार रजनीकांत यांची चाहत्यांमध्ये एक वेगळीच क्रेझ आहे.
 

Web Title: teaser of Rajinikanth's big hit 'Lal Salaam' is out on Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.