'राधे'मध्ये वापरणार 'बाहुबली'चं हे टेक्निक, त्यासाठी सलमान खान मोजणार इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2020 06:00 AM2020-01-29T06:00:00+5:302020-01-29T06:00:00+5:30

सलमान खान आगामी चित्रपट राधे : इंडियाज मोस्ट वॉण्टेडमध्ये सध्या बिझी आहे

This technique of 'Baahubali' to be used in 'Radhe', for which Salman Khan will count as many crores. | 'राधे'मध्ये वापरणार 'बाहुबली'चं हे टेक्निक, त्यासाठी सलमान खान मोजणार इतके कोटी

'राधे'मध्ये वापरणार 'बाहुबली'चं हे टेक्निक, त्यासाठी सलमान खान मोजणार इतके कोटी

googlenewsNext

दबंग ३ चित्रपटानंतर सलमान खान आगामी चित्रपट राधे : इंडियाज मोस्ट वॉण्टेडमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाला ब्लॉकबस्टर बनवण्यासाठी सलमान खान व दिग्दर्शक प्रभूदेवा यांनी जोर लावला आहे.
राधे चित्रपटाबाबत सलमान खानचे चाहते खूप उत्सुक आहेत. राधेच्या सेटवरून फोटो सोशल मीडियावर बऱ्याचदा व्हायरल होताना दिसतात. आता अशी माहिती मिळतेय की राधे चित्रपटाचा क्लायमॅक्स चांगला बनवण्यासाठी सलमान साडे सात कोटी रुपये खर्च करणार आहेत.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राधे चित्रपटाचा क्लायमॅक्समध्ये खूप व्हीएफएक्सचा वापर केला जाणार आहे. निर्माते यासाठी बाहुबली व बाहुबली २मधील टेक्निकचा वापर करणार आहेत. रिपोर्ट्सनुसार हा क्लायमॅक्स सीन २० मिनिटं मोठा असणार आहे आणि त्यासाठी सलमान साडे सात कोटी रुपये देण्यासाठी तयारदेखील झाला आहे.  


या चित्रपटात सलमान नेहमीपेक्षा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं सलमान खान आणि प्रभूदेवा ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येत आहे. तर भारत सिनेमात सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसलेली दिशा पटानी या चित्रपटात सलमानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तसेच अभिनेता जॅकी श्रॉफ यांचीही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे.


सलमान खान फिल्मच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती सोहेल खान आणि रील लाइफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड करत आहे. 'राधे' चित्रपट २०२०मध्ये ईदच्या वेळी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: This technique of 'Baahubali' to be used in 'Radhe', for which Salman Khan will count as many crores.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.