Tejasswi Prakash आणि Karan Kundrra ने लग्नापूर्वीच केलं फॅमिली प्लॅनिंग?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 05:28 PM2022-03-17T17:28:52+5:302022-03-17T17:29:48+5:30

Karan Kundrra: करण आणि तेजस्वी ही जोडी लग्न कधी करणार हा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. मात्र, या जोडीने लग्नापूर्वीच त्यांचं फॅमिली प्लॅनिंग सुरु केल्याचं सांगण्यात येतं.

Tejasswi Prakash and Karan Kundrra did family planning before marriage? | Tejasswi Prakash आणि Karan Kundrra ने लग्नापूर्वीच केलं फॅमिली प्लॅनिंग?

Tejasswi Prakash आणि Karan Kundrra ने लग्नापूर्वीच केलं फॅमिली प्लॅनिंग?

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) आणि करण कुंद्रा (Karan Kundrra)  ही जोडी सध्याच्या लोकप्रिय जोड्यांपैकी एक असल्याचं पाहायला मिळतं. 'बिग बॉस 15' (bigg boss 15) या वादग्रस्त रिअॅलिटी शोमध्ये यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली. त्यामुळे सध्या ही जोडी सातत्याने चर्चेत येत आहे. विशेष म्हणजे बिग बॉसचा शो संपल्यानंतरही त्यांच्यातील प्रेम कायम असल्यामुळे आता ही जोडी लग्न कधी करणार हा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. मात्र, या जोडीने लग्नापूर्वीच त्यांचं फॅमिली प्लॅनिंग सुरु केल्याचं सांगण्यात येतं. इतकंच नाही याविषयी त्यांनी एका मुलाखतीत खुलासाही केला आहे.

अलिकडेच करण कुंद्राने सिद्धार्थ कन्नन यांना एक विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफवरही चर्चा केली. यात खासकरुन तेजस्वी आणि त्याच्या नात्यावर तो उघडपणे व्यक्त झाला. इतकंच नाही तर लग्नानंतर त्यांचं फॅमिली प्लॅनिंग काय आहे हेदेखील त्याने सांगितलं.

"मला एक गोड मुलगी हवी आहे. पण तिला ( तेजस्वी) २५ बाळं हवी आहेत. पण एक खात्री देतो मी एक चांगला पिता होण्याचा प्रयत्न करेन. मी माझ्या बहिणींच्या मुलांच्या खूप क्लोज आहे. ते लहान असताना त्यांच्यासोबत माझं एक वेगळं अटॅचमेंट झालं होतं, असं करण म्हणाला.
पुढे तो म्हणतो, एक मुलगी व्हावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. मला मुलगी व्हावी यासाठी मी खूप उत्साही आहे," असं करण म्हणाला.

दरम्यान, सध्याच्या घडीला करण आणि तेजस्वी लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. बिग बॉसच्या घरात प्रथम यांची मैत्री झाली आणि त्यानंतर या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं.

Web Title: Tejasswi Prakash and Karan Kundrra did family planning before marriage?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.