"साऊथ फिल्म इंडस्ट्रीत सर्वात जास्त नेपोटिझम", 'बालिका वधू' फेम अविका गोरच्या वक्तव्याने वेधलं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 11:53 AM2023-06-12T11:53:23+5:302023-06-12T11:54:22+5:30
साऊथ फिल्मइंडस्ट्री म्हणजे स्टार पॉवरचं दुकान.
टेलिव्हिजनवरील 'बालिका वधू' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अविका गोर (Avika Gor) सध्या चर्चेत आहे. तिला आजही आनंदी नावानेच ओळखलं जातं. अविकाने नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. विक्रम भट यांच्या '1920:हॉरर ऑफ द हार्ट' या सिनेमात मुख्य भूमिका साकारत आहे. सिनेमाच्या प्रमोशननिमित्त ती अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे. दरम्यान तिने एका मुलाखतीत दाक्षिणात्य इंडस्ट्रीला नेपोटिझमचे दुकान म्हणल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
अविकाने मालिकांमध्ये काम केल्यानंतर आता ती मोठ्या पडद्यावर नशीब आजमावत आहे. तिने अनेक साऊथ सिनेमांमध्ये काम केले. सिद्धार्थ कननच्या शोमध्ये दिलेल्या मुलाखतीत अविका म्हणाली,'लोकांना फक्त बॉलिवूडमध्ये घराणेशाही दिसते, पण सर्वात जास्त तर दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीत नेपोटिझम आहे. जेव्हा स्टार पॉवरची गोष्ट येते तेव्हा साऊथ पूर्णपणे स्टार पॉवर आहे. नेपोटिझम ऐकून आपण थकलो आहोत..पण लोक बॉलिवूडकडे नेपोटिझमच्या दृष्टीने बघतात तसे ते साऊथ इंडस्ट्रीकडे बघत नाहीत.'
"विक्रम भट यांचा व्हिडिओ कॉल आला अन्..." दिग्दर्शकाचं बोलणं ऐकून शॉक झाली अविका गोर
ती पुढे म्हणाली, 'हिंदी फिल्मसाठी एक बायस क्रिएट केला गेला आहे. ते जे बनवतात आपण पहिले जज करतो. वेळेनुसार पक्षपात वाढत चालला आहे आणि इंडस्ट्रीचा एक भागच बनत चालला आहे. साऊथ सिनेमांचे अनेक रिमेक बनले. मग यांनी विचार केला की आपण कॉपी करु. मला वाटतं हा फक्त पक्षपातपणा आहे.'
अविकाने स्वत: अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 2013 मध्ये तिने तेलुगू फिल्म 'उय्यला जम्पला' मधून डेब्यू केले. तर आता ती बॉलिवूड सिनेमात दिसणार आहे. 1920:द हॉरर ऑफ हार्ट' ही फॅमिली ड्रामा हॉरर फिल्म आहे. कृष्णा भट यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. कृष्णा भट फिल्ममेकर विक्रम भट यांची मुलगी आहे आणि या सिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. फिल्मची पटकथा महेश भट आणि विक्रम भट यांनी लिहिली आहे. 23 जून रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे.