‘तेरे नाम’मध्ये सलमानच्या मागे धावणारी ती वेडसर महिला आठवते? खऱ्या आयुष्यात दिसते लय भारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 08:00 AM2022-03-03T08:00:00+5:302022-03-03T09:49:17+5:30
Tere Naam : ‘तेरे नाम’मध्ये तिच्या वाट्याल एकही संवाद आला नाही. पण तिच्या चेहऱ्यावरचे जिवंत भाव बघून प्रेक्षक तिच्या प्रेमात पडलेत...जाणून घ्या सध्या ती काय करते?
2003 मध्ये आलेला ‘तेरे नाम’ (Tere Naam) या सिनेमानं प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. राधे नावाचा कॉलेजमधला एक टपोरी युवक आणि साधी सरळ निर्जला यांची ही लव्हस्टोरी तुफान गाजली होती. या चित्रपटातील सलमानची (Salman Khan) हेअर स्टाईलही ‘राधे कट’नावानं ओळखली जाऊ लागली होती. सतीश कौशिक दिग्दर्शित हा सिनेमा ‘सेतु’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. सलमानच्या बुडत्या करिअरला या सिनेमाने आधार देणाऱ्या या सिनेमातील एक वेडी भिकारी मुलगी तुम्हाला आठवतं असेलच. पात्र लहान होतं, पण वेड्यांच्या इस्पितळात जाणाऱ्या सलमानला रोखण्यासाठी त्याच्या मागे धावत सुटणारी ती वेडसर महिला आणि तो सीन पाहिल्यानंतर अनेकांचे डोळे पाणावले होते.
डोळ्यांत पाणी आणणाऱ्या त्या दृश्यातील ती वेडसर महिला दुसरी कुणी नसून एक मोठी नायिका आहे. होय, राधिका चौधरी (Radhika Chaudhari) तिचं नाव.
‘तेरे नाम’मध्ये ती भलेही फाटक्या, मळलेल्या कपड्यात दिसली असेल. पण रिअल लाईफमध्ये ती कमालीची सुंदर आहे. हिंदीसोबतच साऊथच्या अनेक चित्रपटांत तिने काम केलंय.
राधिका चौधरी हिची फिल्मी करिअरची सुरूवात 1999 मध्ये झाली होती. आपल्या कारकिर्दीत तिने पहिल्यांदा तेलगू चित्रपटात काम केलं. यानंतर पहिल्यांदा तिला ‘खुशी’ नावाच्या हिंदी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात फरदीन खान आणि करीना कपूर मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटा नंतर राधिकाने आणखी काही चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आणि मग एक दिवस अचानक अभिनयाच्या या जगातुन गायब झाली.
‘तेरे नाम’मध्ये राधिकाच्या वाट्याल एकही संवाद आला नाही. पण तिच्या चेहऱ्यावरचे जिवंत भाव बघून प्रेक्षक तिच्या प्रेमात पडलेत. ‘तेरे नाम’नंतर राधिकाने अन्य एक दोन सिनेमे केलेत आणि अचानक अभिनयाला रामराम ठोकला.
यानंतर ती दिग्दर्शनाकडे वळली. 2010 मध्ये लास वेगास फिल्म फेस्टिवलमध्ये तिच्या ‘ऑरेंज ब्लॉसम’ या शॉर्ट फिल्मने सिल्व्हर ऐस अवार्ड जिंकला होता.