Thalapathy Vijay च्या Arabic Kuthu गाण्याने लोकांना लावलं 'वेड', काही तासातच मिळाले कोट्यावधी व्ह्यूज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 02:10 PM2022-03-11T14:10:35+5:302022-03-11T14:13:30+5:30

Thalapathy Vijay's Song Arabic Kuthu : अरेबिक कुथु (Arabic Kuthu) गाण्याची क्रेझ केवळ साऊथमध्येच नाही तर नॉर्थ इंडियातही बघायला मिळत आहे. गाण्यातील विजय आणि पूजाची केमिस्ट्रीही लोकांना खूप आवडत आहे.

Thalapathy Vijay and Pooja Hegde's song Arabic Kuthu goes viral, crosses 22 million views | Thalapathy Vijay च्या Arabic Kuthu गाण्याने लोकांना लावलं 'वेड', काही तासातच मिळाले कोट्यावधी व्ह्यूज

Thalapathy Vijay च्या Arabic Kuthu गाण्याने लोकांना लावलं 'वेड', काही तासातच मिळाले कोट्यावधी व्ह्यूज

googlenewsNext

तमिळ सिनेमांचा सुपरस्टार थलापति विजय (Thalapathy Vijay) सध्या त्याच्या आगामी 'बीस्ट' सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमात विजय आणि अभिनेत्री पूजा हेगडे दिसणार आहे. याच सिनेमातील गाणं अरेबिक कुथु हे रिलीज करण्यात आलं असून हे गाणं तूफान व्हायरल झालं आहे. काही तासातच या गाण्याला २२ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. याआधी पुष्पातील गाणी व्हायरल झाली होती.

अरेबिक कुथु (Arabic Kuthu) गाण्याची क्रेझ केवळ साऊथमध्येच नाही तर नॉर्थ इंडियातही बघायला मिळत आहे. गाण्यातील विजय आणि पूजाची केमिस्ट्रीही लोकांना खूप आवडत आहे. या गाण्याचे बोल, बीट्स आणि मुव्ह्स लोकांना खूप आवडत आहे. ‘अरबिक कुथु’ गाणं अनिरुद्ध रविचंदर आणि जोनिता गांधी गायलं आहे. 

ट्रेड एक्सपर्टनुसार, हे गाणं अनेक रेकॉर्ड्स कायम करू शकतं. 'बीस्ट' हा सिनेमा १४ एप्रिलला सिनेमागृहात रिलीज होणार आहे. या सिनेमात विजय आणि पूजासोबतच योगी बाबू, जॉन विजय, अपर्णा दास, लिलीपुट फारूकी दिसणार  आहे.
विजय जोसेफ म्हणजेच थलापति विजयला बीस्ट सिनेमासाठी चांगली मोठी रक्कम मिळाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सन पिक्चर्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या बीस्टसाठी विजयला १०० कोटी रूपये मानधन मिळालं. हा सिनेमा एप्रिल महिन्यात वेगवेगळ्या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. सध्या  सिनेमाचं पोस्ट प्रॉडक्शनचं काम सुरू आहे. 
 

Web Title: Thalapathy Vijay and Pooja Hegde's song Arabic Kuthu goes viral, crosses 22 million views

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.