शाहरुख, सलमान नाही तर 'हा' आहे देशातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता; घेतो 'इतके' कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 10:54 AM2023-06-27T10:54:35+5:302023-06-27T10:57:09+5:30

अभिनेत्याने बॉलिवूडच्या सुपरस्टार्सवर मात केली आहे.

Thalapathy Vijay beats shahrukh khan salman khan to become highest paid actor in india sets record | शाहरुख, सलमान नाही तर 'हा' आहे देशातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता; घेतो 'इतके' कोटी

शाहरुख, सलमान नाही तर 'हा' आहे देशातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता; घेतो 'इतके' कोटी

googlenewsNext

भारतात फिल्म इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता कोण आहे? गेल्या अनेक वर्षांपासून या प्रश्नाच्या उत्तरात कधी अक्षय कुमार, कधी सलमान खान तर कधी शाहरुख खानचे नाव पुढे येत आहे. पण यावेळी असं कोणतंही नाव समोर आलेलं नाही. कारण दाक्षिणात्य अभिनेत्याने बॉलिवूडच्या सुपरस्टार्सवर मात केली आहे. तो केवळ साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्येच नव्हे तर संपूर्ण भारतात सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता बनला आहे. या अभिनेत्याबद्दल जाणून घेऊया... 

रिपोर्ट्सनुसार, थलापति विजय आता भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता बनला आहे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत विजय त्याच्या चित्रपटांसाठी 100 कोटी रुपये घेत होता. पण आता त्याने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केल्याने त्याची फी दुप्पट वाढली आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. 

आता तो त्याच्या पुढच्या 'थलापति 68' या चित्रपटासाठी 200 कोटी रुपयांची तगडी फी घेत आहे. विशेष म्हणजे थलापति विजयच्या आधी देशातील कोणत्याही अभिनेत्याने एका चित्रपटासाठी 200 कोटी रुपये फी घेतलेली नाही. थलापति विजय ज्या चित्रपटासाठी 200 कोटी रुपये मानधन घेत आहे त्याचे तात्पुरते नाव 'थलपति 68' ठेवण्यात आले आहे. 

विजयच्या कारकिर्दीतील हा 68 वा चित्रपट आहे. असं म्हटलं जात आहे की, हा थलापतिचा शेवटचा चित्रपट देखील ठरू शकतो. कारण या चित्रपटानंतर तो राजकारणात पाऊल ठेवण्याचा विचार करत आहे. मात्र, याप्रकरणी थलापति विजयकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Thalapathy Vijay beats shahrukh khan salman khan to become highest paid actor in india sets record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.