शाहरुख, सलमान, प्रभास मागे टाकत साऊथचा हा हिरो बनला सर्वात महागडा स्टार! घेतोय इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 02:07 PM2023-05-20T14:07:37+5:302023-05-20T17:32:50+5:30

थलपथी विजय हा साऊथचा सर्वात मोठा सुपरस्टार आहे. आता तो भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता बनला आहे.

Thalapathy vijay becomes highest paid indian actor as he charges 200 crores for next film | शाहरुख, सलमान, प्रभास मागे टाकत साऊथचा हा हिरो बनला सर्वात महागडा स्टार! घेतोय इतके कोटी

शाहरुख, सलमान, प्रभास मागे टाकत साऊथचा हा हिरो बनला सर्वात महागडा स्टार! घेतोय इतके कोटी

googlenewsNext

थलपथी विजय हा साऊथचा सर्वात मोठा सुपरस्टार आहे. विजय थलपती (Vijay Thalapathy) हा साऊथ सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारा स्टार आहेत. त्याची खूप मजबूत फॅन फॉलोइंग आहे. विजयची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. थलपथी विजयचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतात. आता थलपथी विजयबद्दल मोठी बातमी येत आहे की तो भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता बनला आहे. तो त्याच्या एका चित्रपटासाठी 200 कोटी रुपये मानधन घेत असल्याचे सांगितले जात आहे.

मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगितले जात आहे की थलपथी विजयने त्याच्या पुढील चित्रपटासाठी 200 कोटी रुपये फी आकारली आहे. थलपथी विजयने त्याच्या पुढील चित्रपटासाठी दक्षिण उद्योगातील लोकप्रिय दिग्दर्शक व्यंकट प्रभू यांच्याशी हातमिळवणी केली आहे. ही रक्कम एजीएस एंटरटेनमेंटकडून थलपथी विजयला दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


थलपथी विजयला 200 कोटी रुपयांचे मानधन मिळणार याबाबत निर्माते किंवा अभिनेत्याकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही. एजीएस एंटरटेनमेंट ही तीच कंपनी आहे जिने २०१९ मध्ये रिलीज झालेल्या थलपथी विजयचा 'बिगिल' चित्रपटाची निर्मिती केली होती.


वर्कफ्रंटबद्दल...
विजय थलपतीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, तो शेवटचा 'वारीसू' चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाने जगभरात ३०० कोटींहून जास्त कमाई केली आहे. वारिसू चित्रपटातील विजयसोबतची रश्मिका मंदान्नाची केमिस्ट्री खूप आवडली होती. आता अभिनेता लोकेश कनागराज दिग्दर्शित आगामी लिओ चित्रपटात दिसणार आहे. १९ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात दाखल होणार्‍या लिओ चित्रपटाचा संजय दत्त देखील एक भाग आहे. याशिवाय विजय थलपती शाहरुख खानच्या जवान या चित्रपटात दिसणार आहे, मात्र यामध्ये तो फक्त कॅमिओ करताना दिसणार आहे.
 

Web Title: Thalapathy vijay becomes highest paid indian actor as he charges 200 crores for next film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.