Thalapathy Vijay Birthday : ती शूटींग पाहायला आली आणि तो तिच्या प्रेमात पडला..., थलपती विजयची फिल्मी लव्हस्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 11:53 AM2022-06-22T11:53:47+5:302022-06-22T11:56:35+5:30
Thalapathy Vijay Birthday : थलापती विजयच्या फिल्मी करिअरबद्दल सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण त्याच्या पर्सनल लाईफबद्दल फार कमी लोकांना ठाऊक आहे. त्याची लव्हस्टोरी तर एकदम फिल्मी आहे.
Thalapathy Vijay Birthday : जोसेफ विजय चंद्रशेखरला फॅन्स थलापती विजय नावानं ओळखतात. थलापती विजय (Thalapathy Vijay) म्हणजे तामिळ फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार. दोन दशकांपासून फिल्मी दुनियेत स्वत:चा दबदबा निर्माण करणाऱ्या सुपरस्टार विजयचे आज जगभर चाहते आहेत. लाखो-करोडो फॅन्सच्या गळ्यातील तो ताईत आहे. आज विजय त्याचा 48 वा वाढदिवस साजरा करतोय. थलापती विजयच्या फिल्मी करिअरबद्दल सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण त्याच्या पर्सनल लाईफबद्दल फार कमी लोकांना ठाऊक आहे. त्याची लव्हस्टोरी तर एकदम फिल्मी आहे. (Thalapathy Vijay Sangeetha Sornalingam Love Story )
होय, विजयने त्याच्या एका फिमेल फॅनसोबत लग्न केलं. तिचं नाव संगीता सोरनालिंगम. ती श्रीलंकेतील एका उद्योगपतीची लाडकी लेक आणि विजयची खूप मोठी फॅन होती. एक दिवस ती आपल्या लाडक्या स्टारला म्हणजे विजयला भेटायला आली आणि तो स्टार तिच्याच प्रेमात पडला. आज आम्ही विजय आणि संगीताची हीच झक्कास लव्हस्टोरी तुम्हाला सांगणार आहोत.
विजय आणि संगीताची लव्ह स्टोरी
तर... विजय त्याच्या एका चित्रपटाच्या शूटींगसाठी चेन्नईला गेला होता. विजय त्यावेळी फार काही मोठा स्टार नव्हता. पण तरिही शूटींगस्थळी चाहत्यांनी गर्दी केली होती. अनेकजण विजयला भेटायला उत्सुक होते. संगीता नावाची एक फिमेल फॅन सुद्धा या गर्दीत होती. ती त्याला भेटण्यासाठी खास लंडनमधून भारतात आली होती. ती विजयला भेटली आणि तिने त्याला त्याच्या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्यात. ही मुलगी इतक्या लांबून आपल्याला भेटायला आली, हे ऐकून विजय चांगलाच इम्प्रेस झाला होता. त्याने थेट संगीताला संध्याकाळी घरी येण्याचं निमंत्रण दिलं. इथून दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि पुढे विजय आपल्या या फिमेल फॅनच्या प्रेमात कधी पडला, हे त्याचं त्यालाही कळलं नाही. 25 ऑगस्ट 1999 रोजी विजयने संगीतासोबत लग्नगाठ बांधली.
असं आहे विजयचं फिल्मी करिअर
सुपरस्टार विजयचे वडील एस.ए. चंद्रशेखर हे कॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. विजयने आपल्या वडिलांच्या 15 चित्रपटांमध्ये काम केलं आहे, त्यापैकी सहा चित्रपटांमध्ये तो बाल कलाकार म्हणून झळकला.
वयाच्या 18 व्या वर्षी विजय ‘नालैय्या थीरपू’ या चित्रपटात लीड अॅक्टर म्हणून झळकला. या चित्रपटातील त्याचं नाव विजय होतं. याच नावाने त्याने 8 चित्रपटांत काम केलं. 1992 मध्ये आलेला ‘नालैय्या थीरपू’ हा चित्रपट फार काही कमाल दाखवू शकला नव्हता. पण त्यानंतर विजयने एकामागून एक तीन हिट चित्रपट देऊन सर्वांची बोलती बंद केली. विजयने आतापर्यंत आपल्या कारकीर्दीत 65 हून अधिक चित्रपटांत काम केलं असून त्यापैकी बहुतेक बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले आहेत.