थॅक्यू अकोला! ‘जवान’ला मिळणारा प्रतिसाद पाहून शाहरुखही भारावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2023 19:05 IST2023-09-10T19:04:06+5:302023-09-10T19:05:28+5:30
बॉलिवूड किंग शाहरुख खानने अकोलेकरांचे आभार मानले आहेत.

Shahrukh Khan
बॉलिवूड किंग खानने ‘जवान’मधून बॉक्स ऑफिसवर धमाका केलाय. या सिनेमाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. अनेक ठिकाणी या सिनेमाचे मोठमोठे पोस्टर्स लागले आहेत. प्रेक्षकांच हे प्रेम पाहून शाहरुख खान चांगलाच भारावला आहे. इतकंच नाही तर तो शक्य होईल त्याप्रमाणे चाहत्यांचे आभार मानत आहे. यात त्याने नुकतेच अकोलेकरांचे आभार मानले आहेत.
Thank u Akola. Love you and what a huge banner. Feeling all like a big star now!! Love u and be happy always. https://t.co/4mx8DqN4pr
— Shah Rukh Khan (@iamsrk) September 8, 2023
‘फर्स्ट डे, फर्स्ट शो’ला शाहरुख खानच्या चाहत्यांचा समूह ‘एसआरके वॉरिअर्स’ने चित्रपटगृहावर एक मोठा फलक झळकवला. यावेळी चाहत्यांनी जल्लोष देखील केला. यानंतर खुद्द शाहरुखने अकोलेकर चाहत्यांचे आभार मानलेत. ट्विटमध्ये शाहरुख म्हणाला,” धन्यवाद अकोला! तुमच्यासाठी खुप सार प्रेम आणि हे किती मोठे बॅनर आहे. हे पाहून खूप मोठ्या स्टार सारखं वाटत आहे. प्रेम करा आणि आनंदी रहा.”
अटली कुमार दिग्दर्शित ‘जवान’ चित्रपटात शाहरुख खान, नयनतारा आणि विजय सेतुपथी यांच्या मुख्य भूमिका आहेत. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने या चित्रपटात पाहुणी कलाकाराची भूमिका साकारली आहे. तर मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक ‘जवान’मध्ये झळकली आहे.