जॅकी भगनानीने 'बेल बॉटम'ला मिळणाऱ्या प्रतिक्रियेबद्दल मानले आभार!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 07:56 PM2021-08-05T19:56:00+5:302021-08-05T19:56:26+5:30
बॉलिवूडचा निर्माता जॅकी भगनानी कोविड -१९ च्या दूसऱ्या लाटेनंतर बेलबॉटमच्या ब्लॉकबस्टर रिलीजसाठी सज्ज झाला आहे.
बॉलिवूडचा निर्माता जॅकी भगनानी कोविड -१९ च्या दूसऱ्या लाटेनंतर बेलबॉटमच्या ब्लॉकबस्टर रिलीजसाठी सज्ज झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून प्रेक्षकांच्या कौतुकाचा विषय ठरत आहे.
जॅकीने आपल्या सोशल मीडियावर या ट्रेलरला मिळणाऱ्या कौतुक आणि प्रेमाविषयी आभार व्यक्त करताना लिहिले, माझ्या चेहऱ्यावर खूप मोठे स्मितहास्य आहे आणि माझ्या अंतःकरणात कृतज्ञता भरली आहे. ट्रेलरला मिळालेल्या या जबरदस्त प्रतिसादाबद्दल आम्ही प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो.
बेल बॉटम ८० च्या दशकात घडणारी गुप्तहेर कथा असून १९ ऑगस्टला सिनेमागृहात रिलीज होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असून असीम अरोरा आणि परवेज शेख द्वारा लिहिण्यात आलेल्या या चित्रपटाचे चित्रीकरण स्कॉटलॅंडमध्ये करण्यात आले आहे.
या महामारीच्या काळात जॅकी भगनानी आपल्या संपूर्ण टीमसोबत स्कॉटलॅंडमध्ये सर्व खबरदारी घेऊन शूटिंग सुरू करणारे आणि ते यशस्वीरित्या पूर्ण करणारे पहिली व्यक्ती होती. लॉकडाऊनच्या काळात, जॅकी भगनानीने आपले म्युझिक लेबल जे जस्ट म्यूजिक अंतर्गत 'मुस्कुराएगा इंडिया' आणि अशा इतर अनेक गाण्यांसोबत प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते.
जॅकी 'बेल बॉटम' व्यतिरिक्त 'करना', 'गणपथ' सारख्या बॅक-टू-बॅक ब्लॉकबस्टर्ससोबत प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. 'करना'चे प्री-प्रोडक्शन अंडर प्रोसेस असून 'गणपथ'च्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे.