बॉलिवूडचा Thanos! 'स्त्री २'मध्ये अक्षय कुमारची दहशत, आजवर न दिसलेला ताकदवान खलनायक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 15:04 IST2024-08-15T15:03:06+5:302024-08-15T15:04:30+5:30
'स्त्री २'मध्ये अक्षय कुमारला पाहून लोकांच्या आनंदाला उधाण आलंय. अक्षयने आजवर कधीही न साकारलेली भूमिका केलेली दिसतेय (stree 2, akshay kumar)

बॉलिवूडचा Thanos! 'स्त्री २'मध्ये अक्षय कुमारची दहशत, आजवर न दिसलेला ताकदवान खलनायक
सध्या एका सिनेमाची बॉक्स ऑफिसवर चांगलीच चर्चा आहे तो म्हणजे 'स्त्री २'. राजकुमार राव-श्रद्धा कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला 'स्त्री २' हा सिनेमा रिलीज होताच हाऊसफुल्ल गर्दीत सुरु झालाय. अनेकांना हा सिनेमा आवडत असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या सिनेमाला मिळतोय. 'स्त्री २' सिनेमा पाहायला गेलेल्या लोकांना एक मोठं सरप्राईज मिळालंय. सिनेमात अक्षय कुमारची विशेष भूमिका असल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय.
अक्षय कुमार 'स्त्री २' मध्ये विशेष भूमिकेत
ज्यांनी 'स्त्री २' सिनेमा पाहिलाय त्यांना सिनेमात एक खास सरप्राईज मिळालंय. ते म्हणजे सिनेमा संपल्यावर एंड क्रेडीट सीन्समध्ये अक्षय कुमारला पाहायला मिळतंय. अक्षय कुमार सिनेमात एक ताकदवान खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. अक्षयला पाहून सर्वजण त्याला बॉलिवूडचा Thanos म्हणत आहेत. Thanos हा हॉलिवूडच्या गाजलेल्या Avengers फिल्म सीरिजमधील खलनायक आहे. त्यामुळे अक्षयची भूमिका पाहून सर्वांना Thanos ची आठवण आली. अक्षयचा कॅमिओ नेमका काय आहे? हे मात्र तुम्हाला सिनेमा पाहिल्यावरच समजेल.
Welcome to the Supernatural Comedy Universe 'THANOS' of India, The OG Baap of comedy @AkshayKumar
— Akkian_Emine🇹🇷🧡🇮🇳 (@Akkian_Emine87) August 15, 2024
KILLER THANKS #AkshayKumar𓃵 Legend for a reason. Respect and Love. This is best cameo🙏#Stree2#AkshayKumar#Killer#KhelKhelMein is now theatres please go and watch both movies pic.twitter.com/jsbKWqg47l
category :bollywood creating songs just to admire Shraddha Kapoor's beauty ♥️ #Stree2#ShraddhaKapoor#Stree2Reviewpic.twitter.com/QvL1PHQ9Pd
— Real Box office™ (@Real_Box_0ffice) August 14, 2024
'स्त्री २' ला प्रेक्षकांची पसंती
'स्त्री', 'भेडीया', 'मुंज्या' या सिनेमांनंतर 'स्त्री २' या युनिव्हर्सला पुढे घेऊन जाणार आहे. या सिनेमात राजकुमार राव, अपारशक्ती खुराना, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी हे कलाकार पुन्हा एकदा धमाल करताना दिसणार आहेत. अक्षय कुमार या सिनेमात कॅमिओ भूमिका करत असल्याने हा सिनेमा आणखी लोकप्रिय होईल यात शंका नाही. 'स्त्री २' सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो याचीही सर्वांना उत्सुकता आहे.