Thappad Movie Poster: तापसी पन्नूच्या 'थप्पड'चा फर्स्ट लूक रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 17:58 IST2020-01-30T17:57:29+5:302020-01-30T17:58:10+5:30
Thappad Movie : तापसी पन्नूचा सिनेमा थप्पडचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

Thappad Movie Poster: तापसी पन्नूच्या 'थप्पड'चा फर्स्ट लूक रिलीज
बॉलिवूडची पिंक गर्ल म्हणजेच अभिनेत्री तापसी पन्नूच्या आगामी चित्रपट 'थप्पड'ची नुकतीच घोषणा करण्यात आली. अनुभव सिन्हा दिग्दर्शित या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट २८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
तापसी पन्नूने 'थप्पड' चित्रपटातील तिचा लूक सोशल मीडियावर शेअर केला आणि लिहिले की, क्या यह बस इतनी सी बात है?
'थप्पड' चित्रपटातील तापसीचा लूक पाहिल्यानंतर तिचे चाहते या चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर ३१ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टरवर थप्पड़: बस इतनी सी बात? असे लिहिण्यात आलं आहे.
थप्पड चित्रपटाचे दिग्दर्शन अनुभव सिन्हा करत आहेत. याआधी तापसी आणि अनुभव यांनी २०१८ साली मुल्क चित्रपटासाठी एकत्रित काम केले आहे. थप्पड २८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तापसीच्या व्यतिरिक्त या चित्रपटात रत्ना पाठक, मानव कौल, दीया मिर्झा आणि राम कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
या चित्रपटा व्यतिरिक्त तापसी पन्नूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर तापसी शाबाश मिट्ठू या चित्रपटात दिसणार आहे. हा सिनेमा भारतीय महिला क्रिकेट टीमची कॅप्टन मिताली राजच्या जीवनावर आधारीत आहे.
शाबाश मिट्ठूचे दिग्दर्शन राहुल ढोलकिया करत आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी ५ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.