Saif Ali Khan : आरोपी हाच!, सैफ अली खान हल्लाप्रकरणी पोलिसांचा मोठा खुलासा, म्हणाले - "भक्कम पुरावे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 17:26 IST2025-01-28T17:25:43+5:302025-01-28T17:26:17+5:30

Saif Ali Khan : मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषदेत सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी नवीन अपडेट दिली आहे.

The accused is the same!, Police make a big revelation in Saif Ali Khan attack case, said - ''Strong evidence...'' | Saif Ali Khan : आरोपी हाच!, सैफ अली खान हल्लाप्रकरणी पोलिसांचा मोठा खुलासा, म्हणाले - "भक्कम पुरावे..."

Saif Ali Khan : आरोपी हाच!, सैफ अली खान हल्लाप्रकरणी पोलिसांचा मोठा खुलासा, म्हणाले - "भक्कम पुरावे..."

१६ जानेवारी रोजी सैफ अली खान(Saif Ali Khan)च्या वांद्रे येथील घरात घुसून त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शरीफुल इस्लामला अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास करत असलेले पोलीस आरोपींची चौकशी करत असून यादरम्यान नवनवीन खुलासेही समोर येत आहेत. दरम्यान या प्रकरणी आज मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन काही खुलासे केले आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी अभिनेत्यावर हल्ला करणारा आरोपी शरीफुल इस्लामच असल्याचे म्हटले आहे.

मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषदेत सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी नवीन अपडेट दिली आहे. ते म्हणाले की, फिंगरप्रिंट्स संदर्भात अद्याप कोणताही रिपोर्ट आलेला नाही. आरोपी ज्या ज्या लोकांच्या संपर्कात आला होता. त्यांच्या चौकश्या सुरू आहेत. या संदर्भात भक्कम आणि टेक्निकल पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे सैफवर हल्ला करणारा आरोपी हाच आहे. 

अभिनेत्याच्या तब्येतीत होतेय सुधारणा

अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरी एका चोराने घुसून चाकूने हल्ला केला होता. त्यानंतर त्याला मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला हॉस्पिटलमधून रजा देण्यात आली असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. सैफने मुंबई पोलिसांसमोर आपला जबाब नोंदवला. ज्यामध्ये त्याने म्हटले की, आरोपीने त्यांच्या घरातील हाऊस हेल्पर मेडवर हल्ला केला आणि १ कोटी रुपये मागितले. जेव्हा त्याने थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा हल्लेखोराने अचानक त्याच्यावर अनेक वार केले आणि तो पळून गेला. यानंतर सैफला उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याच्यावर दोन सर्जरी करण्यात आल्या.

Web Title: The accused is the same!, Police make a big revelation in Saif Ali Khan attack case, said - ''Strong evidence...''

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.