अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'मध्ये रश्मिका मंदानासोबत या अभिनेत्रीची लागली वर्णी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 04:38 PM2022-08-05T16:38:06+5:302022-08-05T16:38:57+5:30
Pushpa 2 : आता पुष्पा २ बद्दल आणखी एक मोठी अपडेट समोर येत आहे. आता या चित्रपटात रश्मिका मंदानाशिवाय आणखी एका अभिनेत्रीची वर्णी लागली आहे.
साउथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) ‘पुष्पा: द राइज’ (‘Pushpa: The Rise’) चित्रपट रिलीज होऊन बराच काळ लोटला असला तरी चित्रपटाची क्रेझ संपण्याचे नाव काही घेत नाही आहे. अल्लू अर्जुनच्या या चित्रपटातील अभिनयापासून ते त्यातील डायलॉग आणि गाण्यांपर्यंत सर्वच गोष्टींनी रसिकांच्या मनावर छाप उमटवली आहे. हा चित्रपट सुपरहिट ठरल्यापासून प्रेक्षक त्याचा दुसरा भाग ‘पुष्पा: द रुल’च्या (‘Pushpa: The Rise’ 2) प्रदर्शनाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. म्हणूनच चित्रपटाशी संबंधित प्रत्येक अपडेटची चाहते नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतात. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की अल्लू अर्जुनच्या लूक्सवर खूप एक्सपेरिमेंट करत आहे, आता पुष्पा २ बद्दल आणखी एक मोठी अपडेट समोर येत आहे. आता या चित्रपटात रश्मिका मंदानाशिवाय आणखी एका अभिनेत्रीची वर्णी लागली आहे.
पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागाने थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर, लोकांना त्याच्या दुसऱ्या भागाकडून खूप अपेक्षा आहेत. हेच कारण आहे की पहिल्या भागात चित्रपटात अनेक मोठे स्टार्स असताना या भागात आणखी काही मोठी नावे जोडली जाणार असल्याचे समजते आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री प्रियामणीने ‘(Priyamani) पुष्पा: द रुल’ या चित्रपटात पुष्पा २ साईन केला आहे.
त्याची भूमिका या चित्रपटात खूप महत्त्वाची असणार आहे. या चित्रपटात ती विजय सेतुपतीच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसणार आहे. मात्र, अद्याप निर्माते किंवा प्रियामनी यांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. पण रिपोर्ट्सनुसार तिने या भूमिकेसाठी होकार दिल्याचे समजते आहे.
पुष्पा २ चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे, त्यामुळे लवकरात लवकर शूटिंग पूर्ण करण्याचा दबाव निर्मात्यांवर आहे. अशाच एका मुलाखतीत निर्माता वाय रविशंकर यांनी शूटिंगच्या वेळापत्रकाचा खुलासा करताना सांगितले की, ‘तेलुगू फिल्म इंडस्ट्रीत सध्या संप सुरू आहे. हा संप ऑगस्ट अखेर मिटण्याची शक्यता आहे. त्यानंतर आम्ही चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करू.