आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 05:37 PM2024-05-10T17:37:07+5:302024-05-10T17:39:00+5:30
या अभिनेत्रीने सलमान खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण तिला सिनेइंडस्ट्रीत फारसे यश मिळाले नाही.
सलमान खान (Salman Khan) बॉलिवूडचा असा अभिनेता आहे, जो आजपर्यंत अनेकांसाठी देवदूत ठरला आहे. त्याच्या दयाळूपणाचे किस्से बऱ्याचदा ऐकायला मिळत असतात. आता अभिनेत्री पूजा डडवाल (Pooja Dadwal)ने सलमानला जीवनातील देवदूत म्हटलं आहे. पूजाने सलमानसोबत वीरगतीमध्ये काम केले होते. या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आता इतक्या वर्षांनंतर अभिनेत्रीने भाईजानचं कौतुक केले आहे.
९०च्या दशकात पूजा डडवालने सलमान खानसोबत 'वीरगती' या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली, पण हा चित्रपट फारसा कमाल दाखवू शकला नाही. सलमानची हिरोईन कुठे गायब झाली हेही कळले नाही. काही वर्षांनंतर पूजा डडवाल सलमानबद्दल बोलली आहे. एका मुलाखतीत भाईजानबद्दल म्हणाली की, 'सलमान सरांबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे, ते जसे आहेत तसे सर्वांना दाखवत नाहीत. ते खूप गोड माणूस आहेत. ते माझ्यासाठी देवदूत आहेच. जसे ७ वर्षांपूर्वी मी हॉस्पिटलमध्ये होते. त्यावेळी ते माझ्या मदतीसाठी पुढे आले. आज मला जे दुसरे जीवन मिळाले आहे ते केवळ त्यांच्यामुळेच.
पूजाने मालिकेतही केलंय काम
बॉलिवूडमध्ये पदार्पण केले तेव्हा पूजा केवळ १७ वर्षांची होती. 'वीरगती'नंतर ती 'तुमसे प्यार हो गया', 'दबदबा' आणि 'हिंदुस्तान' सारख्या सिनेमांमध्ये दिसली, पण तिला यश मिळाले नाही. यानंतर ती सिनेमा सोडून टीव्हीकडे वळली. तिने 'आशिकी' आणि 'घराना' सारख्या मालिकेमध्ये काम केले, पण टीव्हीवर जास्त काळ टिकू शकली नाही. अखेर तिने लग्न करून सेटल होण्याचा निर्णय घेतला.
अचानक तिच्या आयुष्यात आलं मोठं वादळ
सगळं सुरळीत चालू होतं, मग तिच्या आयुष्यात मोठं वादळ आलं. २०१८ मध्ये तिची तब्येत अचानक बिघडली. तिला गंभीर आजार क्षयरोग झाला होता. कठीण काळात, तिचे कुटुंब आणि पती सर्वांनी तिला सोडून दिले. त्यावेळी अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितले होते की, 'जोपर्यंत मी कमवत होते, तोपर्यंत सगळे माझ्या सोबत होते, पण आजारी पडताच सगळे मला सोडून गेले.'
सलमानमुळे पूजाला मिळाले जीवनदान
अभिनेत्रीचे वजन २५ किलोपर्यंत कमी झाले होते. कठीण काळात तिने चाळीत राहून दिवस काढावे लागले. जेव्हा सलमानला पूजाच्या तब्येतीबद्दल कळले तेव्हा तिने त्याच्यावर तातडीने उपचार केले. त्यानंतर पूजाला नवीन जीवन मिळाले, ज्यासाठी ती अजूनही अभिनेत्याची आभारी आहे. बरे झाल्यानंतर पूजाने २०२० मध्ये 'शुक्राना गुरुनानक देव जी' या पंजाबी चित्रपटाद्वारे पुनरागमन केले, परंतु पुन्हा एकदा ती काही कमाल दाखवू शकली नाही.