Chhaava Movie : औरंगजेबाच्या सैन्याचा हल्ला अन् आगीत होरपळणारी ती मुलगी..., असा शूट झाला 'छावा'चा 'हा' सीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 15:09 IST2025-03-11T15:08:28+5:302025-03-11T15:09:05+5:30

Chhaava Movie : अभिनेता विकी कौशलचा छावा हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन २५ दिवस झाले आहेत आणि या चित्रपटाने जगभरात ७०० कोटींचा टप्पा पार केला आहे.

The attack by Aurangzeb's army and the girl burning in the fire..., how shoot this scene in Chhaava Movie | Chhaava Movie : औरंगजेबाच्या सैन्याचा हल्ला अन् आगीत होरपळणारी ती मुलगी..., असा शूट झाला 'छावा'चा 'हा' सीन

Chhaava Movie : औरंगजेबाच्या सैन्याचा हल्ला अन् आगीत होरपळणारी ती मुलगी..., असा शूट झाला 'छावा'चा 'हा' सीन

अभिनेता विकी कौशल(Vicky Kaushal)चा 'छावा' (Chhaava Movie) हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन २५ दिवस झाले आहेत आणि या चित्रपटाने जगभरात ७०० कोटींचा टप्पा पार केला आहे. ऐतिहासिक ॲक्शन ड्रामा चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराज यांची तर रश्मिका मंदाना हिने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे अनेक किस्से आपल्याला ऐकायला मिळत आहेत. या चित्रपटातला एक सीन तुम्हाला धडकी भरायला लावणारा ठरला आहे. त्यात मुघल सैन्य स्वराज्याच्या दिशेने हल्ला करण्यासाठी येतात तेव्हा एक मुलगी त्यांच्या निशाण्यावर येते. ते तिला जाळून टाकतात. हा सीन जिच्यावर चित्रीत झाला आहे, तो स्टंट एका मराठमोळ्या मुलीने साकारला आहे. 

छावा सिनेमात जेव्हा औरंगजेब त्याची लाखोंची फौज घेऊन स्वराज्याचे दिशेने दाखल होतात तेव्हा शेळ्या मेंढ्या वळणारी ही तरुणी काहीतरी विचित्र घडणार याचा संकेत देते. त्यावेळी मागून येणारे मुघल सैन्य तिला जाळून टाकताना दिसतात. हा स्टंट करणारी मुलगी मराठमोळी आहे.तिचं नाव आहे साक्षी सकपाळ. 



साक्षी सकपाळला स्टंट करण्याची खूप आवड आहे. डान्सर, स्टंट आर्टिस्ट आणि डान्स इंडिया डान्सचा स्पर्धक सद्दाम शेख यांच्याकडे ती याचे धडे गिरवत आहे. छावा चित्रपटातील या भूमिकेसाठी साक्षीची ऑडिशनद्वारे निवड करण्यात आली. या भूमिकेसाठी लागणारी तिची मेहनत छावा चित्रपटात दिसून आली. 

'छावा'ने 'गदर २'लाही टाकलं मागे
विकी कौशलच्या छावा या चित्रपटाने सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या गदर २ चित्रपटाला मागे टाकले आहे आणि दहाव्या क्रमांकावर आला आहे. सॅल्कनिकने दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपटाने २५ व्या दिवशी ६.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ही कमाई गदर २च्या हिंदी एकूण ५२५.७ रुपयांपेक्षा जास्त आहे. आत्तापर्यंत चित्रपटाची कमाई ५२६.३१ कोटींवर पोहोचली आहे.

Web Title: The attack by Aurangzeb's army and the girl burning in the fire..., how shoot this scene in Chhaava Movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.