९०च्या दशकातला 'छोटा बच्चा' आता दिसतो खूप हॅण्डसम, पण आता त्याला मिळाली नाही तितकी प्रसिद्धी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 12:13 IST2025-04-04T12:12:17+5:302025-04-04T12:13:12+5:30
बॉलिवूडमध्ये अनेक सुपरस्टार्सनी बाल कलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. असाच एक बालकलाकार, जो ९० च्या दशकातील दिग्दर्शक-कलाकारांचा आवडता मानला जात होता. मात्र, तुम्हाला हे जाणून धक्का बसेल की, गेल्या ९ वर्षांत या अभिनेत्याचा फक्त एकच चित्रपट हिट ठरला आहे.

९०च्या दशकातला 'छोटा बच्चा' आता दिसतो खूप हॅण्डसम, पण आता त्याला मिळाली नाही तितकी प्रसिद्धी
बॉलिवूडमध्ये अनेक सुपरस्टार्सनी बाल कलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. श्रीदेवी, रेखा आणि अशी बरीच नावं आहेत, ज्यांनी बालकलाकार म्हणून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले आणि आज ते यशाच्या शिखरावर आहेत. असाच एक बालकलाकार, जो ९० च्या दशकातील दिग्दर्शक-कलाकारांचा आवडता मानला जात होता. मात्र, तुम्हाला हे जाणून धक्का बसेल की, गेल्या ९ वर्षांत या अभिनेत्याचा फक्त एकच चित्रपट हिट ठरला आहे.
आम्ही ज्या अभिनेत्याबद्दल बोलत आहोत त्याने सलमान खान, आमिर खान आणि गोविंदा यांसारख्या सुपरस्टार्ससोबतही काम केले आहे. मात्र आता तो बॉलिवूडपासून दूरावल्यामुळे आता तो टीव्ही आणि ओटीटी मालिकांकडे वळला आहे. हा अभिनेता म्हणजे ओमकार कपूर (Omkar Kapoor). ज्याने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात 'मासूम' चित्रपटातून केली होती, त्यानंतर त्याला प्रचंड प्रेम मिळाले आणि तो सर्वांचा आवडता बनला. यानंतर ओमकारने गोविंदासोबत 'हिरो नंबर १'मध्ये काम केले, 'जुडवा'मध्ये यंग राजाची भूमिका साकारली, तसेच 'जुदाई' चित्रपटात अनिल कपूर आणि श्रीदेवीच्या मुलाच्या भूमिकेतून सर्वांना थक्क केले. बालकलाकार म्हणून ओमकारने इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवला होता.
कार्तिक आर्यनसोबत चित्रपट
बालकलाकार म्हणून आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावणाऱ्या ओमकार कपूरने लव रंजनच्या 'प्यार का पंचनामा २' या चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून काम केले होते, ज्यात कार्तिक आर्यन, सनी सिंग, नुसरत भरुचा, इशिता राज शर्मा आणि सोनाली सहगल यांच्याही भूमिका होत्या. हा चित्रपट सुपरहिट ठरला. मात्र, ओमकार कपूरचा पुढचा चित्रपट 'झूठा कहीं का' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला.
९ वर्षात एकही हिट चित्रपट ठरला नाही हिट
चित्रपटांव्यतिरिक्त, हा अभिनेता भूत पूर्वा आणि भ्रम सारख्या अनेक वेब सीरिजमध्ये देखील दिसला. २०२० मध्ये, ओमकार कपूरने झी ५ शॉर्ट फिल्म फॉरबिडन लव्ह: अरेंज्ड मॅरेजमध्ये नीलची भूमिका साकारली होती आणि एमएक्स प्लेयरच्या बिसात या वेब सीरिजमधील अभिजित वर्मा या त्याच्या पात्रानेही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. ओमकारचा शेवटचा हिट चित्रपट २०१५ मध्ये आलेला प्यार का पंचनामा २ होता आणि त्यानंतर ९ वर्षात त्याला एकही हिट चित्रपट मिळाला नाही.
सध्या तो वळलाय ओटीटीकडे
अलीकडेच ओमकार सोनी सबवरील 'आंगन अपना का' या मालिकेत केमिओ करताना दिसला होता. याशिवाय, तो झी ५ वरील ओटीटी मालिका ला वास्तेमध्ये दिसला आहे, ज्यामध्ये अभिषेक चौधरी, राजेश बोनिक यांची भूमिका आहे. ही थ्रिलर सीरिज सुदीश कनोजिया यांनी दिग्दर्शित केली असून सुदिश कनोजियासह आदित्य वर्मा यांनी लिहिलेली आहे.