'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 03:54 PM2024-05-10T15:54:46+5:302024-05-10T15:55:27+5:30
श्रीदेवीला आदरांजली म्हणून आणि नागरीकांच्या विनंतीचा मान ठेऊन अंधेरीतील लोखंडवाला संकुलातील एका चौकाचं नामांतर करण्यात आलंय (sridevi)
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी. आज श्रीदेवी आपल्यात नाही तरीही तिचे सिनेमे पाहून आजही चाहत्यांचं मनोरंजन होतं. २४ फेब्रुवारी २०१८ ला श्रीदेवीच्या अकस्मात निधनाने सर्वांना मोठा धक्का बसला. आजही चाहते श्रीदेवीची आठवण जागवतात. अशातच BMC ने श्रीदेवीला अनोखी आदरांजली वाहिली आहे. अंधेरी लोखंडवाला मधील एका चौकाला श्रीदेवीचं नाव देण्यात आलंय.
Quint च्या रिपोर्टनुसार, अंधेरीमधील लोखंडवाला कॉम्पेल्क्समधील एका चौकाला श्रीदेवीचं नाव देण्यात आलंय. 'श्रीदेवी कपूर चौक' असं नामकरण करण्यात आलंय. श्रीदेवी अंधेरी लोखंडवाला कॉम्पेल्क्स विभागात राहायची. या विभागातील ग्रीन एकर्स टॉवरमध्ये श्रीदेवी गेली अनेक वर्ष राहत होती. अखेर श्रीदेवीच्या करिअरला एक आदरांजली म्हणून याच भागातील एका चौकाला 'श्रीदेवी कपूर चौक' असं नाव देण्यात आलंय.
'Sridevi Kapoor Chowk': BMC's Tribute To Late Veteran Actress; Names Junction After Her In Andheri's Lokhandwala Complex
— Mumbaipressnews (@MumbaiPressNews) May 10, 2024
For Detailed News-Press linkhttps://t.co/BwmeV9lR4u#Sridevi#BMC#andheri#NewsUpdate#mumbaipress#mumbaiconnect#mumbairaabta
अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्स भागात राहणाऱ्या अनेक स्थानिक रहिवाश्यांनी आणि इतर संस्थांनी BMC कडे याविषयी विनंतीचे अर्ज पाठवले होते. याशिवाय श्रीदेवीची अंत्ययात्रा याच परिसरातून गेली होती. शेवटपर्यंत श्रीदेवीची नाळ या विभागाशी जोडली गेली आहे. विभागातील अनेक लोकांशी श्रीदेवीचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे नागरिकांच्या विनंतीला मान देऊन अंधेरी लोखंडवाला कॉम्पेल्समधील विभागाचं नाव 'श्रीदेवी कपूर चौक' असं ठेवण्यात आलंय