इरफानच्या शेवटच्या दिवसांना आठवून भावुक झाला दिग्दर्शक, म्हणाला- "मला एकच खंत की..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 02:13 PM2024-11-26T14:13:08+5:302024-11-26T14:13:44+5:30
I want to talk चे दिग्दर्शक शूजित सरकार इरफानच्या शेवटच्या क्षणांना आठवत काय म्हणाले?
सध्या अभिषेक बच्चनच्या I want to talk सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. हा सिनेमा शूजित सरकार यांनी दिग्दर्शित केलाय. शूजित सरकार यांनी बॉलिवूडमध्ये आतापर्यंत पिकू, विकी डोनर, सरदार उधम, ऑक्टोबर, मद्रास कॅफे यांसारखे वेगळ्या धाटणीचे सिनेमे दिग्दर्शित केले आहेत. शूजित यांच्या पिकू सिनेमात दिवंगत अभिनेता इरफानने काम केलं होतं. या सिनेमापासून शूजित आणि इरफानची चांगली मैत्री होती. इरफानच्या शेवटच्या दिवसांबद्दल शूजित यांनी एका मुलाखतीत खुलासा केला.
इरफानचे शेवटचे दिवस आठवत शूजित भावुक
इरफान आणि शूजित यांची पिकू सिनेमापासून मैत्री झाली. तेव्हापासून शूजित जसं वेळ मिळेल तसं इरफानला जाऊन भेटायचा. त्याच्याशी गप्पा मारायचा. शूजित म्हणाला की, "जेव्हा इरफानला कॅन्सर झाला हे कळालं तेव्हा मी त्याच्याशी अनेकदा बोलत असे. मानसिकरित्या इरफान कॅन्सरशी लढू शकला नाही. इरफानचं निधन झाल्यानंतर मी अशा लोकांसाठी सिनेमा बनवायचा निर्णय घेतला जे मानसिकरित्या अशा आजारांशी लढण्यासाठी संघर्ष करतात. हा सिनेमा इरफानसंबंधित नसून मानसिकरित्या या आजाराशी झुंज देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा हा सिनेमा आहे. मी माझ्या मित्राला १०० दिवसांची वेळ दिली होती. पण आज तो अनेक दिवस जगला आहे."
आजही शूजित यांना सतावते ही खंत
इरफानच्या निधनामुळे शूजितला जो धक्का बसलाय त्यातून अजूनही तो सावरला नाहीये. पिकूनंतर त्यांना इरफानसोबत काम करायचं होतं. परंतु पिकूनंतर शूजित यांना पुन्हा कधीही इरफानसोबत सिनेमासाठी काम करण्याचा योग आला नाही, ही खंत त्यांच्या मनाला सतावते. दरम्यान शूजित सरकार दिग्दर्शित अभिषेक बच्चनची प्रमुख भूमिका असलेला I want to talk सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झाला असून संमिश्र प्रतिसादात सुरु आहे.