'पिकू' सिनेमाच्या दिग्दर्शकालाही होता constipation चा त्रास, अशी केली आजारावर मात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 02:40 PM2024-11-06T14:40:43+5:302024-11-06T14:41:26+5:30
'पिकू' सिनेमा ज्यावर आधारीत होता तोच आजार सिनेमाच्या दिग्दर्शकालाही होता
२०१५ साली आलेला 'पिकू' सिनेमा आजही सर्वांचा फेव्हरेट आहे. अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण आणि इरफान या तिघांनी सहजसुंदर अभिनयाने हा सिनेमा चांगलाच गाजवला. आजही अनेकजण हा सिनेमा आवडीने पाहतात. या सिनेमात अमिताभ बच्चन यांना constipation अर्थात बद्धकोष्ठतेचा आजार झालेला असतो. योगायोग म्हणजे सिनेमाचे दिग्दर्शक शूजित सरकार यांनाही हा आजार होता. त्यांनी यावर कशी मात केली याचा खुलासा एका मुलाखतीत केली.
समदीश भाटियाला दिलेल्या मुलाखतीत शूजित सरकार यांनी हा खुलासा केला. तुम्हाला कधी constipation चा त्रास झालाय का असं विचारताच शूजीत सरकार म्हणाले, "मला आता हा त्रास नाहीय. पण यापूर्वी हा त्रास होऊन गेलाय." पुढे यावर कशी मात केली याबद्दल शूजित यांनी खुलासा केला की, "फक्त दीर्घ श्वास आणि मेडिटेशन या दोन गोष्टींनी ही समस्या दूर झाली."
पुढे शूजित सरकार म्हणाले, "आमच्या खाण्याची सिस्टिमच अशी आहे की गॅस हा जो शब्द आहे तो आमच्या संस्कृतीचा एक भाग आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी तुम्हाला होमिओपॅथी वगैरे गोष्टी हमखास दिसतीलच." अशाप्रकारे शूजित सरकार यांनी खुलासा केला. शूजित यांचा आगामी सिनेमा I want to talk ची सध्या खूप चर्चा आहे. या सिनेमात अभिषेक बच्चन प्रमुख भूमिकेत दिसणार असून २२ नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.