'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा दुसरा सीझन हसवण्यासाठी सज्ज, पहिल्या एपिसोडमध्ये कोण असणार पाहुणे?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 10:50 AM2024-08-12T10:50:24+5:302024-08-12T10:52:58+5:30

'द ग्रेट इंडियन कपिल शो' च्या सर्व चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

The Great Indian Kapil Show season 2 to go floors from August 13 | 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा दुसरा सीझन हसवण्यासाठी सज्ज, पहिल्या एपिसोडमध्ये कोण असणार पाहुणे?

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा दुसरा सीझन हसवण्यासाठी सज्ज, पहिल्या एपिसोडमध्ये कोण असणार पाहुणे?

The Great Indian Kapil Show :  कॉमेडीच्या जगात कपिल शर्मा (Kapil Sharma) सध्या अग्रेसर आहे. 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा'मधून त्याने अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. यानंतर  तो नेटफ्लिक्सवर 'द ग्रेट इंडियन कपिल शो' (The Great Indian Kapil Show)घेऊन आला. नेटफ्लिक्समुळे आता तो जगभरात पोहोचला आहे. 'द ग्रेट इंडियन कपिल शो चा पहिला सिझन हा १३ एपिसोडनंतर संपला होता. पहिला सिझन संपल्यानंतर चाहते नाराज झाले होते. या कॉमेडी शोचा दुसरा सीझन कधी येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. आता अखेर प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली आहे. 

'द ग्रेट इंडियन कपिल शो' च्या सर्व चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी कपिल शर्मा आणि त्याची टीम सज्ज झाली आहे. ETimes च्या वृत्तानुसार, या शोचं शुटिंग मंगळवारपासून म्हणजेच 13 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. शिवाय, पहिल्या भागामध्ये Bollywood Wives दिसणार आहेत.


'द ग्रेट इंडियन कपिल शो' पहिल्या सीझनमध्ये बॉलिवूड, संगीत आणि क्रिकेटमधील काही दिग्गज कलाकारांनी या शोमध्ये हजेरी लावली होती. आता सिझन २ मध्ये कोणते सेलिब्रिटी पाहुणे म्हणून दिसणार हे पाहणे मनोरंजक असेल. The Great Indian Kapil हा शो 192 देशांमध्ये टेलीकास्ट होत आहे. 

Web Title: The Great Indian Kapil Show season 2 to go floors from August 13

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.