The Great Khali: पुष्पाची क्रेझ संपेना! आता द ग्रेट खली म्हणतात- 'मैं झुकेगा नहीं...'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 02:07 PM2022-01-28T14:07:45+5:302022-01-28T14:07:55+5:30

द ग्रेट खलीने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर व्हिडिओ शेअर केला असून, आतापर्यंत 4 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओमध्ये ते अल्लू अर्जुनचा 'झुकेगा नही' डायलॉग रिक्रिएट करताना दिसत आहे.

The Great Khali: Pushpa's craze is not over yet! Now the Great Khali says pushpa's dialogue | The Great Khali: पुष्पाची क्रेझ संपेना! आता द ग्रेट खली म्हणतात- 'मैं झुकेगा नहीं...'

The Great Khali: पुष्पाची क्रेझ संपेना! आता द ग्रेट खली म्हणतात- 'मैं झुकेगा नहीं...'

googlenewsNext

अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांची प्रमुख भूमिका असलेल्या पुष्पा (Pushpa) चित्रपटाने देशात धुमाकूळ घातला आहे. विविध अभिनेते, क्रिकेटपटू आणि इतर क्षेत्रातील दिग्गज लोक पुष्पातील डायलॉग म्हणत आहेत. दरम्यान, डब्लूडब्लूईमधून लोकप्रिय झालेले द ग्रेट खली यांनाही पुष्पाने वेड लावले आहे. खली यांनी पुष्पातील डायलॉगचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

अल्लू अर्जुनच्या पुष्पातील गाणे, डान्स आणि डॉयलॉग सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहेत. चित्रपटातील संवाद आणि गाणी चाहत्यांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली आहेत. डेव्हिड वॉर्नर, सुरेश रैना आणि हार्दिक पंड्या यांनी अलीकडेच श्रीवल्ली हुक स्टेप करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. आता, द ग्रेट खलीने पुष्पा चित्रपटातील एक लोकप्रिय संवाद लिप सिंक करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

खलीने हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला असून तो आतापर्यंत 4 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडिओमध्ये ते अल्लू अर्जुनचा 'मैं झुकेगा नही...' हा डायलॉग रिक्रिएट करताना दिसत आहे. खलीचा हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला आहे. व्हिडिओवर लोक अनेक मजेशीर कमेंट करत आहेत. ग्रेट खली सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तो अनेकदा आपल्या चाहत्यांसाठी मजेदार व्हिडिओ शेअर करत असतात. 
 

Web Title: The Great Khali: Pushpa's craze is not over yet! Now the Great Khali says pushpa's dialogue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.