Pallavi Joshi : 'द कश्मीर फाइल्स' फेम पल्लवी जोशी अपघातात जखमी, शूटिंगदरम्यान गाडीवरील ताबा सुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 10:24 AM2023-01-17T10:24:50+5:302023-01-17T10:40:45+5:30
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री आणि विवेक अग्निहोत्री यांची पत्नी पल्लवी जोशी यांचा अपघात झालाय.
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री आणि विवेक अग्निहोत्री यांची पत्नी पल्लवी जोशी यांचा अपघात झालाय. हैदराबादमध्ये चित्रपटाच्या सेटवर त्यांचा अपघात झालाय. द काश्मीर फाइल्स (The Kashmir Files)चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि निर्माते अभिषेक अग्रवाल आता त्यांच्या आगामी 'द व्हॅक्सिन वॉर' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. या शूटिंगदरम्यान पल्लवी जोशी (Pallavi Joshi Injured) यांचा अपघात झाला आहे. त्यांना एका कारने धडक दिली. यात त्या जखमी झाल्या आहेत. चित्रपटाच्या सेटवर ही घटना घडली. जखमी अवस्थेत ही त्यांनी शूट पूर्ण केले. शूटिंग पूर्ण केल्यानंतर त्या उपचारासाठी हैदराबाद येथील रुग्णालयात पोहोचल्या.
'द व्हॅक्सिन वॉर' (The Vaccine War) च्या सेटवर एका गाडीचं नियंत्रण सुटले आणि ती पल्लवी जोशी यांना येऊन धडकली. दुखापत असूनही, त्यांनी त्यांचा शॉट पूर्ण केला आणि नंतर उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात गेली. त्या बऱ्या असल्याचे सांगण्यात येत आहे.पल्लवी जोशी यांनी अपघाताच्या एक दिवसापूर्वी द व्हॅक्सिन वॉरच्या सेटवरील त्यांचे दोन फोटो शेअर केले होते.
चित्रपटाच्या माध्यमातून कोविडच्या काळात Covaxin ही लस कशी तयार करण्यात आली त्याची संपूर्ण कथा अग्निहोत्री या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडणार आहेत. हिंदुस्तान टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या या आगामी सिनेमाबद्दल सांगितलं होतं. ते म्हणाले होते की, ‘मी आयसीएमआरचे डायरेक्टर जनरल यांचं Balram Bhargava’s Going Viral – Making of Covaxin: The Inside Story हे पुस्तक वाचलं. कोरोना महामारीदरम्यान लोकांनी, महिलांनी दिवसरात्र न थकता एवढ्या लसी तयार केल्या. 250 कोटी लोकांना त्या देण्यात आल्या. सामान्य लोकांना ही गोष्ट माहित नाहीये. माझ्या चित्रपटातून मी ही गोष्ट लोकांना सांगणार आहे.’