The Kashmir Files : थिएटरनंतर OTT प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालण्यास 'द कश्मीर फाइल्स' सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 14:48 IST2022-03-15T14:44:31+5:302022-03-15T14:48:34+5:30
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित बनलेली ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files ) हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.

The Kashmir Files : थिएटरनंतर OTT प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालण्यास 'द कश्मीर फाइल्स' सज्ज
The Kashmir Files : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित बनलेली ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files ) हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. मोठ्या संख्येने प्रेक्षक चित्रपटगृहात हजेरी लावत आहेत. अनेक प्रेक्षकांना हा चित्रपट पाहिल्यानंतर अश्रू अनावर झाले. या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर तीन दिवसामध्ये 25 कोटीपेक्षा जास्त कमाई केली. हा चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक करत होते. अखेर ती आता पूर्ण होणार आहे.
द कश्मीर फाइल्स जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तो ओटीटी प्लॉटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे. झी- 5 या ओटीटी प्लॅटफोर्मवर रिलीज होणार आहे. महिनाभरानंतर हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होईल. विवेक अग्निहोत्री यांचं या सिनेमासाठी सर्वच स्तरांतून कौतुक होते आहे.
दरम्यान, ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्चला प्रदर्शित झाला. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी आणि चिन्मय मांडलेकर यांसारख्या प्रसिद्ध कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत.